Mumbai Weather : मुंबईतील तापमान 39.7 डिग्री सेल्सिअसवर, उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना कधी मिळणार दिलासा?

| Published : Apr 17 2024, 07:38 AM IST / Updated: Apr 17 2024, 07:42 AM IST

heat wave seen in Uttar Pradesh
Mumbai Weather : मुंबईतील तापमान 39.7 डिग्री सेल्सिअसवर, उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना कधी मिळणार दिलासा?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Mumbai Weather Update : मुंबईत एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गरमा प्रचंड वाढला गेला आहे. शहरातील तापमानात 39 डिग्री सेल्सिअसवर येऊन पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Mumbai Weather : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. शहरातील तापमान 39.7 डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. अशातच हवामान खात्याने बुधवार (17 एप्रिल) उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (16 एप्रिल) उपनगरांमधील तापमान 39.7 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. हे तापमान सामान्य तापमानाच्या 6.3 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक होते. रात्रीही तापमान 27.5 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते.

उष्णतेच्या लाटेपासून कधी दिलासा मिळणार?
हवामान खात्यानुसार, 19 एप्रिलच्या सकाळपासून तापमानात घट होणार आहे. बुधवारपासून सकाळच्या तापमानात 3 ते 4 डिग्री सेल्सिअसची घट होईल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण रात्रीच्या वेळी तापमान 25 ते 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत असल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. (Mumbai madhil tapman kiti ahe?)

उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याला धोका
उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave)  मुंबईसह राज्यातील अन्य ठिकाणी उष्माघाताची (Heat Stroke) प्रकरणे समोर आली आहेत. जेजे रुग्णालयाचे युनिट हेड डॉ. मधुर गायकवाड यांनी म्हटले की, नागरिक थकवा, डोकेदुखी अशा तक्रारी घेऊन येत आहेत. यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यासह गरज भासल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय डिहाइड्रेशनची समस्या उद्भवल्यास त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो असे पुण्यातील कार्डियोलॉजिस्ट डॉ. सुशील कुमार मालानी यांनी म्हटले आहे. डिहाइड्रेशनमुळे ताण वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. काहीवेळेस हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

आणखी वाचा :

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! वांद्रे-धारावीसह या ठिकाणी 18-19 एप्रिलला पाणी कपात

मुंबईतील उष्माघाताचा मुलांना त्रास, जुलाब आणि उलट्यांच्या समस्यांमध्ये वाढ