Mumbai Water Alert : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे 22 नोव्हेंबर 2025 रोजी पाली हिल जलाशयावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे वांद्रे व खार पश्चिमेकडील एच पश्चिम विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. 

मुंबई: मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना! बृहन्मुंबई महानगरपालिका जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्या इनलेटवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम 22 नोव्हेंबर 2025 रोजी हाती घेतले जाणार आहे. हे काम शनिवारी मध्यरात्री 1 ते पहाटे 5 वाजेदरम्यान करण्यात येईल. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल, मात्र या काळात एच पश्चिम विभागातील काही भागांमध्ये पाणी कमी दाबाने येणार आहे.

महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे, तसेच दुरुस्तीच्या काळात काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने 4 ते 5 दिवस पाणी गाळून व उकळूनच पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठा होणारे परिसर

1) एच पश्चिम 01 – सर्वसाधारण परिक्षेत्र

दांडपाडा, गजधरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग

नियमित पाणीपुरवठा: सकाळी 6.30 ते 8.30

वेळेत बदल नाही, परंतु दाब कमी

2) एच पश्चिम 03 – पाली परिसर

कांतवाडी परिसराचा काही भाग, पाली नाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग

नियमित पाणीपुरवठा: सकाळी 10.00 ते दुपारी 2.00

वेळ जशीच्या तशी, दाब कमी

3) एच पश्चिम 06 – खारदांडा परिक्षेत्र

खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गजधरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिम

नियमित पाणीपुरवठा: सायंकाळी 5.30 ते रात्री 10.00 (विस्तारित वेळ)

कमी दाबाने पाणीपुरवठा

4) एच पश्चिम 09 – युनियन उद्यान परिक्षेत्र व पंप परिक्षेत्र 3

हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन उद्यान मार्ग 1 ते 4, पाली हिल व च्युइम गावाचा काही भाग

नियमित पाणीपुरवठा: दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00

वेळेत बदल नाही, मात्र दाब कमी

महापालिकेचे नागरिकांना आवाहन

आवश्यक पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवा

दुरुस्तीच्या काळात पाणी काटकसरीने वापरा

पुढील 4–5 दिवस पाणी उकळून–गाळूनच प्या

प्रशासनास सहकार्य करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या या सूचनांचे पालन करून सर्वांनी सुरक्षित व स्वच्छ पाणी वापरावे.