सार

Water Cut : वरळी, दादारसह मुंबईतील काही ठिकाणी पुढील 24 तासांसाठी 20 टक्के पाणी कपात असणार आहे. याबद्दलची सूचना मुंबई महापालिकेने दिली आहे.

Water Cut : कडाक्याचे ऊन आणि उष्णतेच्या लाटेच्या स्थितीत आता मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. कारण पुढील 24 तासांसाठी संपूर्ण मुंबईत 10 ते 20 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण पश्चिम उपनगरासह मुंबईतील वरळी, प्रभादेवी, दादर, माहिमसह धारावी आणि कुलाबा येथे पुढील 24 तासांसाठी 10 टक्के पाण कपात असणार आहे.

याशिवाय पूर्व उपनगर, वडाळा, सायन, माटुंगा , परळ, भायखळा, माझगावसह सॅण्डहर्स्ट रोड येथील उत्तर भाग, एफ साउथ, ई आणि शहरातील काही ठिकाणी पुढील 24 तासांसाठी 20 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या हायड्रोलिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पडघा पॉवर सबस्टेशनपासून पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पाण्याचा पुरवठा हळूहळू केला जाणार
महापालिकेनुसार, पघडा येथील 100 किलोवॅट पडघा पॉवर सबस्टेशनपासून पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचा वीजपुरवठा 6 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अचानक खंडित झाला. यामुळेच ट्रिटमेंट प्लांट बंद झाले. अशातच यंत्रणा बंद पडल्याने पिसामधून आणले जाणारे पाणीही बंद करावे लागले. मुंबईतील पाणीपुरवठा कोणत्याही व्यत्ययाशिवाय हळूहळू पूर्ववत होत असल्याचेही महापालिकेने म्हटले आहे.

वाहने धुण्यावर बंदी
पाण्याच्या तुटवड्यामुळे ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी वाहने धुण्यावर निर्बंध घातले आहेत. महापालिकेच्या प्रशासनाने सर्विस सेंटर्सला निर्देश दिले आहेत की, येत्या 10 जूनपर्यंत त्यांच्या येथे वाहने धुणे बंद ठेवावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास कार्यवाही केली जाईल. आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिलेत की, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा येथीस सर्व सर्विस सेंटरने आपल्या येथे 10 जूनपर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहने धुणे बंद ठेवावे. खरंतर, धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी वाचा : 

Mumbai Weather : मुंबईतील नागरिकांमध्ये पोटासंबंधित समस्यांमध्ये वाढ, दररोज 30 हून अधिक रुग्णांची रुग्णालयांमध्ये धाव, अशी घ्या आरोग्याची काळजी

Weather Update : उष्णतेची लाट आणि रेकॉर्ड ब्रेक उन्हाळा...जाणून घ्या मुंबईतील तापमानाची स्थिती