MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • मुंबईकरांसाठी 'डबल धमाका'! ३ एप्रिलला दोन नव्या मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण; 'या' भागांचा प्रवास होणार सुसाट

मुंबईकरांसाठी 'डबल धमाका'! ३ एप्रिलला दोन नव्या मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण; 'या' भागांचा प्रवास होणार सुसाट

Mumbai new metro line launch: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ३ एप्रिलला मेट्रो ९ (दहिसर-काशीगाव), मेट्रो २ब (डायमंड गार्डन-मंडाले) या २ नवीन मार्गिकांचे उद्घाटन होणारय. बीकेसीमध्ये वांद्रे ते कुर्ला दरम्यान पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही केले जाईल. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 29 2026, 04:03 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईकरांसाठी 'डबल धमाका'! ३ एप्रिलला दोन नव्या मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण
Image Credit : Getty

मुंबईकरांसाठी 'डबल धमाका'! ३ एप्रिलला दोन नव्या मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण

मुंबई: मुंबईकरांच्या प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी आणि वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी अखेर तो मुहूर्त सापडला आहे! गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन येत्या ३ एप्रिल रोजी होणार आहे. एमएमआरडीएने (MMRDA) दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठी क्रांती होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कोणत्या दोन मार्गिका सुरू होणार?
Image Credit : ANI

कोणत्या दोन मार्गिका सुरू होणार?

१. मेट्रो ९ (दहिसर ते काशीगाव - टप्पा १)

या मार्गिकेमुळे मुंबई आणि मिरा-भाईंदरमधील अंतर कमी होणार आहे. विशेष म्हणजे, या मेट्रोमुळे ठाणे जिल्ह्याचे मेट्रोचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार असून, हजारो प्रवाशांचा दहिसर-मिरा रोड पट्ट्यातील प्रवास वेगवान होईल.

२. मेट्रो २ ब (डायमंड गार्डन ते मंडाले - टप्पा १)

अंधेरी पश्चिम ते मंडाले या मार्गावरील 'डायमंड गार्डन' ते 'मंडाले' हा टप्पा सुरू होत आहे. यामुळे मानखुर्द आणि चेंबूर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. 

Related Articles

Related image1
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी भरून ठेवा! वांद्रे-खारसह 'या' भागांत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद; पाहा प्रभावीत होणाऱ्या परिसरांची यादी
Related image2
बुलेट ट्रेनचा वेग वाढला! २५ पैकी १७ नद्यांवर पूल तयार; मुंबईच्या BKC मध्ये देशातील पहिलं भूमिगत स्टेशन कसं असेल?
35
बीकेसीसाठी 'पॉड टॅक्सी'ची भेट
Image Credit : X

बीकेसीसाठी 'पॉड टॅक्सी'ची भेट

मेट्रोच्या लोकार्पणासोबतच मुंबईकरांना आणखी एक 'सरप्राईज' मिळणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक दरम्यान धावणाऱ्या ८.८ किमी लांबीच्या 'पॉड टॅक्सी' प्रकल्पाचे भूमिपूजनही याच दिवशी पार पडणार आहे. 

45
विनाविलंब प्रवासाची नवी पहाट
Image Credit : X

विनाविलंब प्रवासाची नवी पहाट

या दोन्ही मार्गिका २०२५ च्या अखेरीस तयार होत्या, मात्र निवडणूक आचारसंहिता आणि तांत्रिक कारणांमुळे उद्घाटन लांबणीवर पडले होते. आता सुरक्षा प्रमाणपत्रे आणि सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून, ३ एप्रिलपासून मुंबईतील एकूण कार्यान्वित मेट्रो मार्गिकांची संख्या ६ वर पोहोचणार आहे. 

55
सर्वाधिक फायदा कोणाला?
Image Credit : X

सर्वाधिक फायदा कोणाला?

मिरा-भाईंदरकर: मुंबईला जोडणाऱ्या रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल.

ठाणेकर: जिल्ह्याला पहिली अधिकृत मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळेल.

चेंबूर-मानखुर्द रहिवासी: पूर्व उपनगरातील प्रवाशांना लोकल ट्रेन व्यतिरिक्त सक्षम पर्याय मिळेल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Navi Mumbai Crime: वाशीच्या मिनी सी-शोअरवर १९ वर्षांच्या तरुणाची हत्या, परिसरात खळबळ
Recommended image2
Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक
Recommended image3
Chinchpokali Chintamani 2026 : 'माझा चिंतामणी'च्या गजरात बाप्पाचा भव्य आगमन सोहळा, पाहा खास फोटोज
Recommended image4
मुंबईकरांच्या खिशाला झटका! 1 सप्टेंबरपासून दूध महागणार; लिटरमागे 9 रुपयांची दरवाढ
Recommended image5
Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; कुठे-कसा असेल पाऊस? IMD अलर्ट
Related Stories
Recommended image1
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी भरून ठेवा! वांद्रे-खारसह 'या' भागांत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद; पाहा प्रभावीत होणाऱ्या परिसरांची यादी
Recommended image2
बुलेट ट्रेनचा वेग वाढला! २५ पैकी १७ नद्यांवर पूल तयार; मुंबईच्या BKC मध्ये देशातील पहिलं भूमिगत स्टेशन कसं असेल?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved