Mumbai Local Train Murder : मुंबई लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये दरवाजा बंद करण्यावरुन वाद झाला. यामध्ये एका तरुणाने दुसऱ्याला चाकूने भोकसल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी सध्या अटकेत आहे.
Mumbai Local Train Murder : मुंबईची लाइफलाइन म्हटल्या जाणाऱ्या लोकलच्या माध्यमातून दिवसभरात लाखोंच्या संख्येने नागरिक प्रवास ये-जा करत असता. या दरम्यान लोकलमध्ये अनेक घटना घडल्याचे समोर येते. पण नुकत्याच लोकलमध्ये झालेल्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले गेले आहे. या प्रकरणातील आरोपीला सध्या अटक करण्यात आली आहे. या पुढील तपास पोलिसांकडून केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास कोचमध्ये सदर घटना घडली. यावेळी एका शुल्लक कारणास्तव एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चाकूने भोकसले. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. तर आरोपीला पोलिसांनी अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीची ओखळ रोशन सुवर्णा अशी पटली आहे.
रोशन सुवर्णा नक्की कोण?
आरोपी रोशन सुवर्णा मीरा रोड पूर्वेला राहतो. याचे वय 30 वर्षे असून तो कार्गोसाठी बारकोड तयार करण्याचे काम करतो. याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
नक्की काय घडले?
23 जूनच्या रात्री 10.50 वाजता नालासोपाराजवळ एका फास्ट लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये पावसाचे पाणी आत येत होते. यावेळी प्रवासी मयंक याने लोकलचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी रोशन सुवर्णाने मयंकसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद ऐवढा विकोपाला गेला की, आरोपीने मयंकवर चाकूहल्ला केला. यामध्ये मयंक जागीच मृत्यू पावला.
असा पकडला आरोपी
घटनेचे गांभीर्य पाहता पश्चिम रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेगाने तपास सुरू केला. यासाठी एकूण सात टीमची स्थापना करण्यात आली. बोरीवली, अंधेरी, मीरा रोड आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांसह आजूबाजूच्या परिसरात 400 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. यानंतर आरोपी नक्की कुठेय याची माहिती पोलिसांना मिळाली. पण तेथून त्याने पळ काढला. बोरीवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच्या काही तासानंतर आरोपीला पनवेलमधून अटक करण्यात आली.


