- Home
- Mumbai
- Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी भरून ठेवा! वांद्रे-खारसह 'या' भागांत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद; पाहा प्रभावीत होणाऱ्या परिसरांची यादी
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी भरून ठेवा! वांद्रे-खारसह 'या' भागांत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद; पाहा प्रभावीत होणाऱ्या परिसरांची यादी
Mumbai Water Cut: मुंबई महानगरपालिकेकडून पाली हिल जलाशयाजवळ नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे २८ आणि २९ मार्च रोजी वांद्रे, खार आणि सांताक्रुझमधील काही भागांत १६ तास पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

मुंबईकरांनो, पाणी भरून ठेवा! वांद्रे-खारसह 'या' भागांत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद
मुंबई: वांद्रे, खार आणि सांताक्रुझ परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पाली हिल जलाशयातील पाण्याची पातळी सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) ७५० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे शनिवार, २८ मार्च आणि रविवार, २९ मार्च रोजी मुंबईतील काही प्रमुख भागांत १६ तासांचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
पाणी कपातीचे वेळापत्रक आणि कारण
वांद्रे पश्चिमेतील रामदास नाईक मार्ग, स्वामी विवेकानंद रोड आणि आर.के. पाटकर मार्ग या जंक्शनवर नवीन पाईपलाईन जोडण्याचे काम चालणार आहे. हे काम शनिवारी रात्री ११:०० वाजल्यापासून रविवारी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत सुरू राहील.
कोणकोणत्या भागांत पाणी येणार नाही?
१. पूर्णपणे पाणीपुरवठा बंद (रविवार, २९ मार्च : पहाटे ४:०० ते सकाळी ८:३०)
संपूर्ण खार (पश्चिम) आणि सांताक्रुझ (पश्चिम) भाग.
वांद्रे (पश्चिम) मधील बाजार रोड, जैन मंदिर रोड आणि डी'मोंटे रोड.
२. सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेत पाणी बंद राहणारे भाग
हिल रोड, पेरी रोड, मॅन्युएल गोन्साल्विस रोड, सेंट अँड्र्यूज रोड, सेंट पॉल रोड.
आर.के. पाटकर रोड, जुनी-नवीन कांतवाडी, रणवार गाव, वरोडा रोड, कार्टर रोड.
पाली माला रोड, चिंबई गाव, शर्ली गाव, राजन गाव, माला गाव आणि पाली गाव.
३. कमी दाबाने पाणीपुरवठा (संध्याकाळी ५:३० ते रात्री १०:००)
खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुईम गावठाण, गाझधर बंधारा परिसर.
मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
पाणी कपातीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
पाणी साठवून ठेवा: दोन दिवस पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा.
पाणी उकळून प्या: खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४-५ दिवस पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काटकसरीने वापर: पाणी जपून वापरून महापालिकेला सहकार्य करावे.

