- Home
- Mumbai
- Mumbai Local Update: दिवाळीत मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कुठे-कधी लोकल बंद? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स!
Mumbai Local Update: दिवाळीत मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कुठे-कधी लोकल बंद? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स!
Mumbai Local Update: मध्य रेल्वेने रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मोठा मेगाब्लॉक जाहीर केला, ज्यामुळे दिवाळीच्या काळात हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल. विद्याविहार ते ठाणे, सीएसएमटी ते पनवेल/गोरेगाव या मार्गांवरील अनेक लोकल सेवा ठप्प राहणार.

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी
मुंबई: दिवाळीचा उत्सव सुरू असतानाच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेने रविवारी (19 ऑक्टोबर) मोठा मेगाब्लॉक जाहीर केला असून, त्यामुळे लोकल प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना खोळंबा सहन करावा लागणार आहे.
या ब्लॉकदरम्यान अनेक लोकल सेवा काही तासांसाठी बंद राहणार आहेत, विशेषतः मध्य आणि हार्बर मार्गावर. त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्याआधी वेळापत्रक नक्की तपासा!
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, कुठे आणि केव्हा?
स्थानकं: विद्याविहार ते ठाणे
वेळ: सकाळी 8 ते दुपारी 1.30
परिणाम:
या वेळेत जलद मार्गावरील अप व डाऊन गाड्यांना अन्य मार्गांवर वळवण्यात येईल.
काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होण्याची शक्यता.
हार्बर मार्गावर सेवा ठप्प, प्रवाशांना मोठा फटका
ब्लॉक वेळ: सकाळी 11 ते दुपारी 4.40
प्रभावीत सेवा:
सीएसएमटी–पनवेल मार्ग: 11.16 ते 4.47 दरम्यान लोकल बंद
सीएसएमटी–वांद्रे/गोरेगाव (डाऊन): 10.48 ते 4.43 पर्यंत बंद
पनवेल–सीएसएमटी (अप): 9.53 ते 3.20 पर्यंत सेवा बंद
गोरेगाव/वांद्रे–सीएसएमटी (अप): 10.45 ते 5.13 पर्यंत लोकल नाही
विशेष सुविधा: प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल गाड्या सोडण्यात येणार आहेत.
कांजूरमार्गमध्ये मध्यरात्री पॉवर ब्लॉक, रात्रीच्या लोकलवर परिणाम
स्थान: कांजूरमार्ग स्थानक (कल्याणच्या दिशेचा पूल हटवण्यासाठी)
ब्लॉक वेळ: शनिवारी रात्री 12 ते रविवारी पहाटे 5
परिणाम:
अप आणि डाऊन, जलद व धीम्या मार्गावरील लोकल सेवा बंद
विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर सेवा बंद
रद्द झालेल्या लोकल्स
रात्री 11.40 – ठाणे ते कुर्ला
पहाटे 4.04 – ठाणे ते सीएसएमटी
रात्री 11.38 आणि 12.24 – सीएसएमटी ते ठाणे
काय कराल?
दिवाळीत खरेदी किंवा प्रवासासाठी लोकलने बाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर या वेळापत्रकाचा जरूर विचार करा.
रेल्वे प्रशासनाने पूर्वसूचना दिल्यामुळे योग्य नियोजन करून वेळ वाचवता येईल.

