- Home
- Utility News
- How To Get Refund If IRCTC Payment: ऑनलाईन पेमेंट अडकलंय? रिफंडसाठी ‘ही’ सोपी पद्धत जाणून घ्या, काळजीचं कारण नाही!
How To Get Refund If IRCTC Payment: ऑनलाईन पेमेंट अडकलंय? रिफंडसाठी ‘ही’ सोपी पद्धत जाणून घ्या, काळजीचं कारण नाही!
How To Get Refund If IRCTC Payment: सणासुदीच्या काळात IRCTC वेबसाइट डाऊन झाल्याने अनेक प्रवाशांचे ऑनलाईन पेमेंट अडकले आहे. मात्र, तिकीट बुक न झाल्यास IRCTC च्या ऑटोमॅटिक रिफंड प्रक्रियेद्वारे तुमचे पैसे 3 ते 5 दिवसांत परत मिळतात.

ऑनलाईन पेमेंट अडकलंय?, हे करा
मुंबई: दिवाळीचा हंगाम सुरू असून, देशभरातून हजारो प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटांची ऑनलाईन बुकिंग करत आहेत. मात्र, बुकिंगच्या या शिखर काळात IRCTC ची वेबसाइट आणि मोबाईल अॅप अचानक काही तास डाऊन झाल्याने अनेक प्रवाशांची तारांबळ उडाली.
वेळेवर तिकीट न मिळाल्याने आणि पैसे अडकून पडल्याने असंख्य प्रवाशांनी सोशल मीडियावर तक्रारी नोंदवल्या. ‘Server Unavailable’ हा मेसेज सतत येत असल्याने बुकिंग प्रक्रिया अर्धवटच राहिली.
IRCTC डाऊन होण्यामागचं कारण काय?
दिवाळी आणि छठसारख्या सणांमध्ये लाखो युजर्स एकाच वेळी IRCTC वर लॉगिन करून तात्काळ तिकीट बुकिंग करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अचानक सर्व्हरवर प्रचंड लोड येतो आणि वेबसाइट व अॅप काही काळासाठी काम करणं थांबवतं. ‘Down Detector’ वर तब्बल 5,000 हून अधिक लोकांनी ही समस्या नोंदवली होती.
पेमेंट अडलंय? काळजी करू नका, पैसे परत मिळतील!
जर तिकीट बुक करताना पेमेंट झालं आणि तिकीट जनरेट न झालं, तर घाबरायचं कारण नाही. IRCTC ची रिफंड प्रक्रिया पूर्णतः ऑटोमॅटिक असून, तुमचं नुकसान होणार नाही.
रिफंड मिळवण्याची सोपी प्रक्रिया
ऑटोमॅटिक रिफंड:
पेमेंट अयशस्वी झाल्यानंतर 3 ते 5 कार्यदिवसांत तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात परत जमा होतात.
कमाल कालावधी:
काही तांत्रिक कारणांमुळे रिफंड मिळण्यास जास्तीत जास्त 21 दिवस लागू शकतात.
रिफंड वेळेत न मिळाल्यास काय कराल?
जर ठरलेल्या कालावधीनंतरही रक्कम परत मिळाली नाही, तर पुढील पावलं उचला.
स्क्रीनशॉट जतन करा:
ट्रांझेक्शन फेल झाल्यावर तात्काळ स्क्रीनशॉट घ्या.
ईमेल पाठवा:
care@irctc.co.in
या अधिकृत आयडीवर संबंधित तपशील आणि स्क्रीनशॉटसह मेल करा.
कस्टमर केअरशी संपर्क:
IRCTC हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून तुमची समस्या नोंदवा.
तुमचं पेमेंट अडलं असलं तरी, ते निश्चितपणे मिळेल परत
सणासुदीच्या काळात IRCTC वरचा लोड वाढणं ही सामान्य बाब आहे. त्यामुळे तांत्रिक अडथळे येणं अनपेक्षित नाही. मात्र, IRCTC चं रिफंड सिस्टीम पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक आणि ऑटोमॅटिक आहे. त्यामुळे तुमचं पेमेंट अडलं असलं तरी, ते निश्चितपणे परत मिळेल.

