सार
मुंबईतील मध्य रेल्वेसह पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी (14 जानेवारी) मेगा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
Mumbai Local Mega Block : रविवारी तुम्ही लोकलने प्रवास करण्याचा विचार करताय का? रेल्वेचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा. कारण मध्य रेल्वेने रविवारी (14 जानेवारी) वडाळा रोड आणि मानखुर्ददरम्यान अप-डाउन मार्गावर मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे. याशिवाय पश्चिम मार्गावर सांताक्रुझ आणि गोरेगावदरम्यान एक्सप्रेस लाइनवर ब्लॉक असणार आहे.
ठाणे येथून कल्याणच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर शनिवारी (13 जानेवारी) रात्री ब्लॉक असणार आहे. यामुळे रविवारी या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार आहे. ब्लॉकच्या वेळेत काही लोकल ट्रेन रद्द होणार असून काही लोकल उशिराने धावणार आहेत.
येथे पाहा वेळापत्रक
पश्चिम मार्ग
सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकातील फास्ट अप आणि डाउन मार्गावर सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान, फास्ट लोकल स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत. याशिवाय काही लोकल रद्द आणि उशिराने धावणार आहेत.
हार्बर मार्ग
हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉकवेळी वडाळा रोड येथून मानखुर्द, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/बेलापूर/पनवेल पर्यंत अप-डाउन लोकल रद्द असणार आहेत. सीएसएमटी ते गोरेगाव पर्यंत लोकल नियमित वेळेनुसार धावणार आहेत. याशिवाय पनवेल ते मानखुर्ददरम्यान स्पेशल लोकल चालवल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकातील पाचव्या आणि सहाव्या मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजून 40 मिनिटांपासून ते रविवारी (14 जानेवारी) पहाटे 3 वाजून 40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. यामुळे पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील मेल एक्सप्रेस अप-डाउन मार्गावर चालवली जाणार आहे. याशिवाय मेल एक्सप्रेस 15-20 मिनिटे उशिराने धावणार आहे. रात्रीच्या ब्लॉकमुळे सीएसएमटी आणि कल्याणदरम्यान कोणताही ब्लॉक नसणार आहे.
आणखी वाचा :