- Home
- Mumbai
- Mumbai Rains : गुडघाभर पाणी, समोर रस्ताही दिसेना, लोकल रखडल्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईकरांची दाणादाण, पहा PHOTO
Mumbai Rains : गुडघाभर पाणी, समोर रस्ताही दिसेना, लोकल रखडल्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईकरांची दाणादाण, पहा PHOTO
मुंबई- शहरात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे सायन, गांधी मार्केट, कुर्ला, दादरसह अनेक भागात पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मुंबई : सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं आज मुंबईची तुंबई झाली. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. सलग पाऊस कोसळत आहे. आज मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला असून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सायनमध्येही आता पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. सायन आणि गांधीमार्केटमध्ये पावसामुळे आता रस्त्यांवर काही प्रमाणात पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान रस्ते जलमय झाल्याने वाहतूक धीम्यागतीने सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागाचा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद सुरू आहे.
दादर ते कुर्ला दरम्यान ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे सकाळपासून लोकल वाहतूक देखील उशिराने सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण उडाली आहे. मुसळधार पावसानं टेन्शन दिलं आहे.
कुर्ल्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांचे हाल झाले आहेत.
काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे. त्याच पाण्यातून ट्रॅफिक पोलीस, विद्यार्थी आणि प्रवाशांना वाट काढत जावं लागत आहे. साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
वरळी आणि बोरीवलीतही सकाळपासून जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे. वरळी कोळीवाड्यात पाणी साचलं असून दादरमधील काही ठिकाणी पाणी साचलंय.
मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत पुढचे चार तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर समुद्रालाही उधाण आलं असून १३ फूट उंच लाटा उसळत आहेत.

