मुंबईतील बॅलार्ड पियर येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कार्यालयात रविवारी पहाटे आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास आग लागली.

मुंबई : रविवारी पहाटे मुंबईतील बिलार्ड पियर येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बिलार्ड पियर येथील कैसर ए हिंद या इमारततीत ईडीचे कार्यालय आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अग्नीशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. आठ अग्निशमन गाड्या, सहा जम्बो टॅन्कर, एक एरियल वॉटर टॅन्कर आणि इतर आपत्कालीन वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. ही लेव्हल दोनची आग आहे. त्यामुळे लगेच पावले उचलण्यात आली. पाच मजली इमरतीच्या चौथ्या मजल्यावर आगीला रोकण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

अग्निशमन दलाने पुढे सांगितले की आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या घटनास्थळी अग्निशमन कार्य सुरू असून आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. येथील जवळच्या इतर इमारतींमध्येही आग पसरु नये याची काळजी घेतली जात आहे. 

आगीमुळे या इमारतीच्या वर धूराचे लोळ उठले आहेत. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले होते. भीतीचे कोणतेही कारण नसल्याचे अग्नीशमन दलाने सांगितले आहे.