दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विमानात धूम्रपान करणे प्रवाशाला पडले महागात, केली तुरुंगात रवानगी

| Published : Mar 06 2024, 04:44 PM IST / Updated: Mar 06 2024, 04:49 PM IST

IndiGo
दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विमानात धूम्रपान करणे प्रवाशाला पडले महागात, केली तुरुंगात रवानगी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

दिल्लीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विमानात धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाच्या विरोधात कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रवाशाला तुरुंगात जावे लागले आहे.

Smoking in Flight :  इंडियो (IndiGo) कंपनीच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका 42 वर्षीय प्रवाशाला मंगळवारी (5 मार्च) मुंबई पोलिसांनी धूम्रपान केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, घटना दिल्लीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विमानातली आहे. विमानातील प्रवाशाने शौचालयात कथित रुपात धूम्रपान केल्याचे सांगितले जात आहे.

विमानाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत म्हटले की, इंडिगोच्या फ्लाइट क्रू मेंबर्सला प्रवासी धूम्रपान करत असल्याचे कळले असता त्यांनी प्रवाशाला तसे करण्यापासून रोखले. यानंतर मुंबई विमानतळावर उतरल्यावर प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

इंडिगोच्या फ्लाइट क्रू मेंबर्सने सांगितले की, विमानात प्रवासी धूम्रपान करत असल्याचा वास येत होता. याच कारणास्तव एखादा प्रवासी धूम्रपान करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यावेळी शौचालयातील प्रवासी धूम्रपान करत होता. शौचालयातील प्रवाशाने आपणच धूम्रपान करत असल्याचे मान्य केले. आता प्रवाशाच्या विरोधात आयपीसी (IPC) कलम 336 आणि विमान अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सध्या प्रवाशाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

याआधीही प्रवाशांनी विमानात केलेय धूम्रपान
विमानात धूम्रपान करण्याच्या आरोपाखाली याआधीही काही प्रवाशांच्या विरोधात कार्यवाही करण्यात आली आहे. गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यात देखील दुबईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगोच्या विमानातील टॉयलेटमध्ये एक प्रवासी धूम्रपान करत असल्याचे आढळून आला होता. या प्रवाशाच्या विरोधातही कार्यवाही करत त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आणखी वाचा :

Sandeshkhali : संदेशखळी येथील पीडित महिलांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट, भेटीनंतर महिला झाल्या भावुक

मुंबईला पहिली पॉड टॅक्सी सेवा मिळणार, MMRDA ने ₹1,016.38 कोटी किमतीच्या ARTS प्रकल्पाला दिली मान्यता

EV Vehicle : इलेक्ट्रिक कार या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपेक्षा जास्त प्रदूषण करतात? अभ्यासात करण्यात आला दावा