Gokhale Bridge : आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र, पालिका आयुक्त आणि रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची केली मागणी

| Published : Mar 08 2024, 02:22 PM IST / Updated: Mar 08 2024, 02:24 PM IST

Aaditya Thackeray

सार

मुंबईतील गोखले पूलाचा एक हिस्सा वर्ष 2018 मध्ये कोसळला गेला होता. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. अशातच गोखले पूलाच्या पुर्नबांधणीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.

Ghokhale Bridge : मुंबई महापालिका (BMC) पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात अडकली गेली आहे. खरंतर, गोखले पूलाच्या बांधकामावरुन इंजिनिअर्सच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले जात आहे. याशिवाय गोखले पूल आणि बर्फीवाला फ्लायओव्हरमधील अलाइनमेंट चुकीची झाल्याने महापालिकेची खिल्ली उडवली जात आहे.अशातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thakeray) यांनी राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना एक पत्र लिहिले आहे.

आदित्य ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटलेय की, “गोखले पूलाची पुर्नबांधणी देशाला लाजवणारी गोष्ट आहे. पालिका आयुक्त इकबाल चहल आणि रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. याशिवाय गोखले पूलाच्या पुर्नबांधणीची देखील चौकशी करावी असेही आदित्य ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.”

गोखले पूलामुळे वाहन चालकांचा प्रवासाठीचा फार वेळ वाचतो. पण ब्रिटिश काळातील गोखले पूल जीर्ण झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पूलाच्या पुर्नबांधणीनंतर तो एका बाजूने वाहतूकीसाठी सुरू देखील करण्यात आला. खरंतर, महापालिकेने 200 कोटी रुपये खर्च करून गोखले पुलाची पुर्नबांधणी केली असली तरीही त्यामध्ये गडबड आहे. दरम्यान, अंधेरीतील गोखले पूलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घान काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते.

वर्ष 2022 मध्ये बंद करण्यात आला होता पुल
वर्ष 1975 मध्ये उभारलेल्या गोखले पूलाचा एक हिस्सा 3 जुलै 2018 रोजी कोसळला गेला होता. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे मार्गावरुन जाणारा पूल धोकादायक असल्याने मुंबई महापालिकेने 7 नोव्हेंबर, 2022 रोजी नागरिकांच्या सेवेसाठी बंद केला होता.

गोखले पूल बंद केल्यानंतर पुर्नबांधणीचे काम 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आले होते. महापालिकेने गोखले पूल गेल्या वर्षातच (2023) नागरिकांसाठी सुरू होईल असा दावा केला होता.

आणखी वाचा : 

दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विमानात धूम्रपान करणे प्रवाशाला पडले महागात, केली तुरुंगात रवानगी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला पोलिसांकडून अटक

छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईतील पहिले मंदिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन