मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश आणि सून श्लोकासोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

| Published : Apr 15 2024, 08:12 AM IST / Updated: Apr 15 2024, 08:16 AM IST

Ambani family at siddhivinayak

सार

Mukesh Ambani at Siddhivinayak Temple : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासोबत मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका देखील उपस्थितीत होती.

Mukesh Ambani at Siddhivinyak Temple : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सिद्धिविनायकचे दर्शन घेतले. यावेळी रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाशसह (Akash Ambani) त्याची पत्नी श्लोका मेहताही (Sholka Mehta) उपस्थितीत होती. अंबानी परिवाराने सिद्धिविनायक मंदिरात पूजा-प्रार्थनाही केली.

आकाश आणि श्लोकाही सिद्धिविनायक चरणी
मुकेश अंबानी यांनी पांढऱ्या रंगातील कुर्ता-पायजमा परिधान केला होता. याशिवाय आकाशचा कॅज्युअल लुक आणि श्लोकाने पारंपारिक वस्र परिधान केले होते. आकाश आणि श्लोका यांचा विवाह वर्ष 2019 मध्ये झाले होते. या दोघांनी वर्ष 2020 मध्ये पहिले मुल पृथ्वीला जन्म दिला. याशिवाय कपलला मुलगीही असून वेदा असे तिचे नाव आहे. (Mukesh Ambani yani ghetle siddhivinayakache darshan)

अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन
मार्च महिन्यात 1-3 मार्चमध्ये मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत (Ananat Ambani) आणि राधिकाचे (Radhika Merchant)  प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडले. जामनगरमध्ये जगभरातून प्रतिष्ठित व्यक्ती, व्हीव्हीआयपींसह कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये शाहरुख खान, आमिर खान, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, सैफ अली खान, करीना कपूर, वरुण धवन, अनिल कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरसह राणी मुखर्जीसह अन्य काहींनी उपस्थिती लावली होती. याशिवाय एमएस धोनी, सचिन तेंडुलकरसह रोहित शर्माही अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगला आले होते.

जगभरातील पाहुण्यांमध्ये स्वीडनचे माजी पंचप्रधान कार्ल बिल्ड्ट, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर, गुगलचे अध्यक्ष डोनाल्ड हॅरिसन, ऑस्ट्रेलियाचे माची पंतप्रधान केविन रुड आणि जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष क्लॉस श्वाब यांनीही प्री-वेडिंगला उपस्थिती लावली होती.

आणखी वाचा : 

हार्दिक पांड्याच्या भावाला अटक, फसवणूक आणि पैशांची हेराफेरी केल्याचा आरोप

मुंबईतील राणीबागेत वर्ष 2022-23 दरम्यान 40 पशूंचा मृत्यू, रिपोर्टमधून खुलासा