ठाणे जिल्ह्यातील कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार झाला. आरोपी तिला कल्याणहून अकोल्याला घेऊन गेला आणि 550 किमीच्या प्रवासात अत्याचार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आली होती. यावेळी नराधम आरोपीने तिला हेरलं आणि थेट आपल्या गावी आकोल्याला घेऊन गेला. 550 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ही मुलगी कल्याण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या पादचारी पुलावरून जात होती. त्यावेळी एका तरुणाने तिला हेरलं. त्याने गप्पा मारत तिच्याशी ओळख वाढवली आणि तिला सोबत घेऊन कल्याण पूर्वेकडे गेला. त्यानंतर त्याने तिला आपल्या भावाच्या घरी नेण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या निदर्शनास आलं
मात्र भावाने परिस्थिती ओळखून तिला घरात घेण्यास स्पष्ट नकार दिला. या नंतर संबंधित तरुणाने तिला पुन्हा कल्याण रेल्वे स्थानकात आणून सोडले. त्यानंतर अकोले रेल्वे स्थानकात ही मुलगी पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी अधिक चौकशी केल्यावर त्यांना या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली. तिने आपल्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितलं. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.
हवाली त्यानंतर तरुणीला कल्याण पोलिसांचा हवाली करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी या मुलीवर दुसऱ्या एका नराधमाने बलात्कार केला होता. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. आता पुन्हा एकदा ही मुलगी नराधमाच्या वासनेची शिकार ठरली आहे. आता या प्रकरणाचा तपास अधिक पोलीस करत आहेत.
