MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या २६४० घरांसाठी आजपासून अर्ज सुरू; नोंदणी करण्यापूर्वी 'या' कागदपत्रांची यादी तपासा!

Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या २६४० घरांसाठी आजपासून अर्ज सुरू; नोंदणी करण्यापूर्वी 'या' कागदपत्रांची यादी तपासा!

Mumbai MHADA Lottery 2026: म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील ९७ ठिकाणी २६४० सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली. ही संपूर्ण प्रक्रिया 'फेसलेस' असून, अर्जदार म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट किंवा 'IHLMS 2.0' मोबाईल ॲपद्वारे अर्ज करू शकतात. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 30 2026, 07:59 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या २६४० घरांसाठी आजपासून अर्ज सुरू
Image Credit : Twitter

मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या २६४० घरांसाठी आजपासून अर्ज सुरू

मुंबई: मुंबईत स्वतःच्या मालकीचं घर असावं, हे प्रत्येक सर्वसामान्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आता चालून आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने २६४० सदनिकांसाठी अधिकृतपणे ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा 'गो-लाईव्ह' शुभारंभ केला आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या पारदर्शक आणि अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मुंबईत नेमकी घरं आहेत कुठे?
Image Credit : our own

मुंबईत नेमकी घरं आहेत कुठे?

या लॉटरीमध्ये मुंबईतील तब्बल ९७ विविध ठिकाणच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने

पश्चिम उपनगरे: गोरेगाव (पहाडी, सिद्धार्थ नगर), बोरिवली (मागाठाणे, गोराई).

पूर्व उपनगरे: विक्रोळी (कन्नमवार नगर), चेंबूर, घाटकोपर (पंतनगर), पवई (तुंगा, कोपरी).

शहर भाग: दादर (लोकमान्य नगर), वडाळा (अँटॉप हिल), माझगाव आणि गिरगाव. 

Related Articles

Related image1
MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २६४० घरांसाठी मोठी लॉटरी; आजपासूनच करा अर्ज!
Related image2
अंबाबाईच्या दर्शनाला आता ७५ मिनिटांत पोहचा! मुंबई-कोल्हापूर दरम्यान दिवसातून दोनदा विमानसेवा; पाहा संपूर्ण वेळापत्रक
36
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
Image Credit : our own

अर्ज कसा आणि कुठे करायचा?

म्हाडाची ही संपूर्ण प्रक्रिया आता 'फेसलेस' आणि 'मानवी हस्तक्षेपविरहीत' झाली आहे. तुम्हाला म्हाडा कार्यालयात जाण्याची अजिबात गरज नाही.

वेबसाइट: https://housing.mhada.gov.in

मोबाईल ॲप: 'IHLMS 2.0' (Play Store/App Store वर उपलब्ध).

वैशिष्ट्य: या प्रणालीमध्ये एकदा प्रोफाईल तयार केल्यावर ती कायमस्वरूपी राहील. तुमची पात्रता सोडतीपूर्वीच निश्चित केली जाईल. 

46
अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची 'चेकलिस्ट'
Image Credit : Twitter

अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची 'चेकलिस्ट'

अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा.

आधार कार्ड (मोबाईल नंबरशी लिंक असलेले).

पॅन कार्ड.

अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate): अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा.

उत्पन्नाचा दाखला: १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळातील आयटी रिटर्न (ITR) किंवा तहसीलदारांचा दाखला.

ई-मेल आयडी आणि सक्रिय मोबाईल नंबर. 

56
'जशा आहे तशा' स्थितीतील घरांबाबत महत्त्वाची अपडेट
Image Credit : Twitter

'जशा आहे तशा' स्थितीतील घरांबाबत महत्त्वाची अपडेट

काही सदनिका विकासकांकडून प्राप्त झाल्या असून त्या 'जशा आहेत तशा' (As is where is) विकल्या जाणार आहेत. मात्र, ताबा देण्यापूर्वी म्हाडा त्यांची आवश्यक डागडुजी आणि दुरुस्ती करून देईल. विशेष म्हणजे, घराचा ताबा देण्यापूर्वी थकीत मालमत्ता कर आणि सोसायटी मेंटेनन्सची सर्व देणी म्हाडा स्वतः भरेल, असे आश्वासन संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. 

66
नवी सुविधा
Image Credit : Twitter

नवी सुविधा

तुम्हाला घर घ्यायचे आहे त्या ठिकाणचे 'गूगल लोकेशन' आता ॲपवर उपलब्ध असेल. तसेच, प्रत्यक्ष सदनिका पाहण्यासाठी म्हाडा कर्मचाऱ्यांचे नंबरही लवकरच जाहीर केले जातील.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
'निवडणूक आयोगच व्हिलन', संजय राऊतांचा ममता बॅनर्जींना पूर्ण पाठिंबा
Recommended image2
Mumbai Rent : वांद्र्यात 2BHK साठी 80K भाडं, तरुणी म्हणते 'एक-एक पैसा वसूल'; व्हिडीओ व्हायरल
Recommended image3
Pydhonie Death Case Mumbai : कलिंगड नव्हे, काहीतरी वेगळंच! पायधुनी मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
Recommended image4
Mumbai Pydhonie Death Case : पायधूनीतील चार जणांच्या मृत्यूचे गूढ गडद; डॉक्टरांनी सांगितली ही धक्कादायक माहिती
Recommended image5
कलिंगड खाल्यामुळं मृत्यू होऊ शकतो का, काय आहे खरं कारण
Related Stories
Recommended image1
MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २६४० घरांसाठी मोठी लॉटरी; आजपासूनच करा अर्ज!
Recommended image2
अंबाबाईच्या दर्शनाला आता ७५ मिनिटांत पोहचा! मुंबई-कोल्हापूर दरम्यान दिवसातून दोनदा विमानसेवा; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved