धाराशिव जिल्ह्यातील मुरूम नगरपालिकेत भाजपाने पुन्हा एकदा परंपरेनुसार सत्ता मिळवत नगरपालिकेचा ताबा मिळवला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते बसवराज पाटील यांनी यशस्वी निवडणुकीनंतर मतदारांचे आभार मानले. नगराध्यक्ष पदासाठी बसवराज पाटील यांचा बंधू बापूराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. मुरूम येथून बापूराव पाटील 4000 मतांनी विजयी ठरले. याशिवाय, मुरूम नगरपालिकेतील 20 पैकी 19 जागांवर भाजपाने विजय मिळवला, ज्यामुळे पक्षाच्या सत्तेची ताकद अधिक दृढ झाली आहे. मतदारांच्या विश्वास आणि पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करत बसवराज पाटील यांनी भाजपच्या विजयाची आनंदाची भावना व्यक्त केली आहे.
- Home
- Mumbai
- मुरूम नगरपालिका: भाजपच्या परंपरेनुसार विजय, बसवराज पाटीलांनी मतदारांचे आभार मानले, वाचा नगर पंचायत आणि नगर परिषदेचे निकाल
मुरूम नगरपालिका: भाजपच्या परंपरेनुसार विजय, बसवराज पाटीलांनी मतदारांचे आभार मानले, वाचा नगर पंचायत आणि नगर परिषदेचे निकाल

Maharashtra Local Bodies Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हाती येण्यास सुरवात झाली आहे. भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या उमेदवारांमध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे.
Maharashtra Local Bodies Elections : मुरूम नगरपालिका: भाजपच्या परंपरेनुसार विजय, बसवराज पाटीलांनी मतदारांचे आभार मानले
Maharashtra Local Bodies Elections : राहाता–शिर्डी पालिकेत भाजपचा दणदणीत विजय; विखे पिता–पुत्रांचा जल्लोष, फुगडी ते भन्नाट डान्सने रंगला आनंदोत्सव
राहाता आणि शिर्डी नगरपालिकांमध्ये भाजपाला मिळालेल्या दणदणीत यशानंतर संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. या ऐतिहासिक विजयानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांसह आनंद साजरा केला. विजयाच्या आनंदात विखे पिता–पुत्रांनी फुगडी खेळत पारंपरिक पद्धतीने जल्लोष केला, तर सुजय विखे यांनी नंतर भन्नाट डान्स करत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी, ढोल-ताशांच्या गजरात विजयाचा आनंद साजरा करत परिसर दणाणून सोडला. या विजयानंतर विखे कुटुंबीयांचा जल्लोष चर्चेचा विषय ठरला असून, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास संचारला आहे.
Maharashtra Local Bodies Elections : कराड नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेंद्रसिंह यादव विजयी
कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना यशवंत विकास आघाडी आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी लोकशाही आघाडी यांचे संयुक्त उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे.
Maharashtra Local Bodies Elections : सातारा नगरपालिकेत भाजपचा दणदणीत विजय! अमोल उदयसिंह मोहितेंवर विक्रमी मतांचा वर्षाव
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे अमोल उदयसिंह मोहिते यांना तब्बल 57 हजार 587 मते मिळाली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार सुवर्ण पाटील यांना 15 हजार 555 मते मिळाली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमोल मोहिते यांनी 42 हजार 32 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत रेकॉर्ड केला. या विजयानंतर पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची सातारा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
Maharashtra Local Bodies Elections : लातूरचा निकाल : भाजपचा चार मतदारसंघांत 'गड' कायम, पण औशात 'घड्याळा'चा गजर!
औशात आमदार अभिमन्यू पवारांना धक्का
औसा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. संपूर्ण यंत्रणा आणि ताकद पणाला लावूनही त्यांना आपल्या बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे नेते अफसर शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे वारे फिरवले. अजितदादांच्या सभेने मतदारांमध्ये नवा उत्साह भरला आणि भाजपसमोर एक तगडे आव्हान उभे केले.
जिल्ह्यात भाजपचा 'चौकार'
- एकिकडे औशात धक्का बसला असला तरी, जिल्ह्याच्या इतर भागांत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. निलंगा, अहमदपूर आणि रेणापूर या ठिकाणी भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे.
- निलंग्यात संजयराज हलगरकर यांनी विजयाचा झेंडा फडकवला, तर अहमदपूरमध्ये स्वप्नील व्हत्ते यांनी भाजपच्या विजयाची परंपरा कायम राखली.
- रेणापूर नगरपंचायतीतही भाजपच्या शोभा आकनगिरे यांनी बाजी मारली आहे.
- उदगीरमध्ये मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. तिथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती यशस्वी ठरली आणि स्वाती हुडे यांनी नगराध्यक्षपदावर कब्जा मिळवला.
Maharashtra Local Bodies Elections : सावनेरमध्ये काँग्रेसचा गड कोसळला; आमदार आशिष देशमुखांच्या नेतृत्वात भाजपची ऐतिहासिक घोडदौड
गेल्या अनेक वर्षांपासून सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रावर सुनील केदार यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र, या निवडणुकीत जनतेने केदार यांच्या नेतृत्वाला नाकारत आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या विकासकामांना पसंती दिली आहे. विशेष म्हणजे, सुनील केदार यांच्या स्वतःच्या गावातही काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. येथे काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.
सावनेरमध्ये भाजपचा 'क्लीन स्वीप'
- सावनेर नगर परिषदेत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. निकालाची महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- नगराध्यक्ष: भाजपच्या उमेदवार संजना मंगळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले.
- नगरसेवक: एकूण २३ जागांपैकी भाजपचे २१ नगरसेवक निवडून आले आहेत, तर उर्वरित २ जागांवर स्थानिक आघाडीने विजय मिळवला आहे.
- काँग्रेसची स्थिती: एकेकाळी सत्ता असलेल्या काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत.
Maharashtra Local Bodies Elections : लाईव्ह अपडेट्ससाठी बघा आमचा लाईव्ह टीव्ही

Maharashtra Local Bodies Elections : इस्लामपुरात विरोधकांचा 'करेक्ट कार्यक्रम'
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ईश्वरपूर) नगरपालिकेची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची ठरली होती. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीने एकत्र येत जयंत पाटील यांना त्यांच्याच घरात घेरण्याची रणनीती आखली होती. मात्र, जयंत पाटलांच्या व्यूहरचनेसमोर महायुतीचे सर्व प्रयत्न निष्प्रभ ठरले. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने नगराध्यक्ष पदासह एकूण २३ जागांवर दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे, महायुती आणि काँग्रेसच्या विकास आघाडीला एकत्रितपणे केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाने इस्लामपुरात अद्यापही 'पाटलांचाच शब्द' चालतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
आष्टा आणि पलूसमध्येही सत्तांतर
केवळ इस्लामपूरच नव्हे, तर आष्टा नगर परिषदेतही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता खेचून आणली आहे. जयंत पाटलांच्या या दुहेरी विजयामुळे सांगलीतील महायुतीच्या नेत्यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. दुसरीकडे, पलूस नगरपरिषदेत मात्र काँग्रेसने आपला गड राखण्यात यश मिळवले असून तिथे तिरंगी लढतीत काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.
Maharashtra Local Bodies Elections : जयंत पाटलांनी थोपवली महायुतीची लाट, आष्टा आणि इस्लामपुरात शरद पवार गटाचा झेंडा!
राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची स्थिती आहे. या निकालांनी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना धक्का दिला असून कार्यकर्त्यांनी राज्यभरात गुलाल उधळत जल्लोष सुरू केला आहे. मात्र, या संपूर्ण निकालांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते सांगली जिल्ह्याने. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या बालेकिल्ल्यात महायुतीला जोरदार धोबीपछाड दिली आहे.
Maharashtra Local Bodies Elections : लाईव्ह टीव्ही अपडेट्स बघण्यासाठी खालिल युट्यूब लिंकवर क्लिक करा

Maharashtra Local Bodies Elections : ॲड. आशिष शेलार यांची पोस्ट चर्चेत
Maharashtra Local Bodies Elections : अनगर नगरपंचायतीवर 'पाटील'कीचा निर्विवाद करिष्मा: बिनविरोध निवडीतून राजकीय पकड सिद्ध
महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी अनेकदा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो. पण सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीने याला छेद देत एक वेगळाच आदर्श किंवा वर्चस्वाचा नवा वस्तुपाठ समोर ठेवला आहे. अनगर नगरपंचायतीच्या सर्व १७ जागा आणि नगराध्यक्षपद असे संपूर्ण सभागृह 'बिनविरोध' निवडून आले आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने या बिनविरोध निवडीवर आता अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने अनगरच्या राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
सुनबाईंच्या विजयाचा गुलाल सासऱ्यांच्या हाती या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती नगराध्यक्ष पदाच्या प्रमाणपत्राची. नवनियुक्त नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील या सध्या वैयक्तिक कारणास्तव बंगळुरू येथे आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सासरे आणि राज्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हे विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले. "सुनबाई बंगळुरूला असल्याने मी हे प्रमाणपत्र स्वीकारले आहे," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. राजकारणात सक्रिय असलेल्या पाटील कुटुंबातील सून आता अधिकृतपणे नगराध्यक्ष झाल्या आहेत.
Maharashtra Local Bodies Elections : राज्यातील विजयी मोहऱ्यांवर एक नजर
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. अलिबागमध्ये शेकापच्या अक्षया नाईक यांनी बाजी मारली, तर उरणमध्ये शरद पवार गटाच्या भावना घाणेकर आणि उरुण-इस्लामपूरमध्ये आनंदराव मलगुंडे यांनी विजय मिळवत पक्षाची लाज राखली. पश्चिम महाराष्ट्रात विटा नगरपरिषदेत शिंदे गटाच्या काजल म्हेत्रे तर वाईत भाजपचे अनिल सावंत विजयी झाले.
कोकण पट्ट्यात सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले आणि कणकवलीत संदेश पारकर यांच्या शहरविकास आघाडीने वर्चस्व गाजवले. मराठवाड्यात गंगाखेडमध्ये अजित पवार गटाच्या उर्मिला केंद्रे आणि औसामध्ये परवीन नवाबुद्दीन शेख यांनी विजय मिळवला.
Maharashtra Local Bodies Elections : पक्षीय बलाबल: कोणाची किती ताकद?
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजप १२२ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५३ जागा जिंकून आपले अस्तित्व प्रभावीपणे सिद्ध केले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ३९ जागांवर विजयाची मोहोर उमटवली. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांनी चांगली कामगिरी केली असून, तब्बल २५ ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
दुसरीकडे, महाविकास आघाडीसाठी हे निकाल निराशाजनक ठरले आहेत. आघाडीत काँग्रेस ३४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ ७ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त ८ जागांवर समाधान मानावे लागले.
Maharashtra Local Bodies Elections : महायुतीचा विजयाचा 'गुलाल' तर महाविकास आघाडीला मोठा धक्का
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीचा निकाल अखेर समोर आला असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाने विरोधकांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. एकूण २८८ नगराध्यक्षपदांच्या जागांपैकी १२२ जागांवर कमळ फुलले असून, महायुतीने स्थानिक पातळीवरील सत्तेवर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. या निकालांनी राज्याच्या राजकारणात 'दादा-भाई' आणि भाजपची युतीच वरचढ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
भाजपची 'बिनविरोध' विजयाची हॅट्ट्रिक
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने तीन महत्त्वाच्या जागांवर मतदानापूर्वीच विजय निश्चित केला होता. जळगावमधील जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन, धुळ्यातील दोंडाईचा येथून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल आणि सोलापूरच्या अनगरमधून प्राजक्ता पाटील यांनी बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला.
Maharashtra Local Bodies Elections : पलूसमध्ये काँग्रेसचा झाला विजय
पलूसमध्ये काँग्रेसने नगरपरिषदेतील सत्ता परत मिळवली आहे. येथे पलूस याठिकाणी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सत्ता राखली आहे.
Maharashtra Local Bodies Elections : जयंत पाटलांनी राखला गड, जिंकल्या २३ जागा
सांगली जिल्ह्यामध्ये ईश्वरपूर येथे जयंत पाटील यांनी गड राखला आहे. त्यांनी येथे नगराध्यक्षपद जिंकून २३ जागा जिंकल्या आहेत.
Maharashtra Local Bodies Elections : आमचा लाईव्ह टीव्ही बघा, मिळवा लाईव्ह अपडेट्स

Maharashtra Local Bodies Elections : २८८ पैकी २६७ जागांचे सुरुवातीचे निकाल
२८८ पैकी २६७ जागांचे सुरुवातीचे निकाल हाती आले आहेत. यात भाजपने सर्वाधिक १११ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर ४८ जागांवर शिंदे गट, ४० जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट, २० जागांवर काँग्रेस, १३ जागांवर शरद पवार गट तर ९ जागांवर ठाकरे गट आघाडीवर आहे.
Maharashtra Local Bodies Elections : राज्यातील विजयी नगराध्यक्षांची यादी-
जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
मालवण नगरपरिषद - ममता वराडकर (शिंदे गट)
पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)