MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • मुंबईवर इंधन संकटाचे सावट! पेट्रोल-डिझेल ५० दिवस पुरेल, पण CNG चे काय? १२ लाख वाहनचालकांची धाकधूक वाढली

मुंबईवर इंधन संकटाचे सावट! पेट्रोल-डिझेल ५० दिवस पुरेल, पण CNG चे काय? १२ लाख वाहनचालकांची धाकधूक वाढली

CNG shortage in Mumbai: इराण-अमेरिका संघर्षामुळे मुंबईत इंधन पुरवठ्यात अनिश्चितता निर्माण झाली असून, सीएनजी टंचाईचे संकट ओढवले आहे. पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा असला तरी, पंपांवरील गॅसचा दाब कमी झाल्याने आणि पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 12 2026, 05:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
मुंबईवर इंधन संकटाचे सावट!
Image Credit : twitter

मुंबईवर इंधन संकटाचे सावट!

मुंबई: जागतिक स्तरावरील इराण-अमेरिका संघर्षाचे पडसाद आता थेट मुंबईकरांच्या खिशावर आणि प्रवासावर पडू लागले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यात अनिश्चितता निर्माण झाली असून, मुंबईत सीएनजी (CNG) टंचाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असला तरी, गॅसवर चालणाऱ्या वाहनांसाठी आगामी आठवडा अत्यंत कळीचा ठरणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
पेट्रोल-डिझेल 'ओक्के', पण गॅसचा 'प्रेशर' लो!
Image Credit : twitter

पेट्रोल-डिझेल 'ओक्के', पण गॅसचा 'प्रेशर' लो!

मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात ४५ ते ५० दिवस पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे. मात्र, सीएनजीच्या बाबतीत चित्र थोडे चिंताजनक आहे.

मागणी: मुंबईत दररोज साधारण १० लाख किलो सीएनजीची गरज भासते.

समस्या: सध्या पुरवठा होत असला तरी, पंपांवरील गॅस भरण्याचा 'दाब' (Pressure) कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परिणाम: काही पंपांना १००% क्षमतेने पुरवठा मिळत नसल्याने वाहनचालकांना गॅस भरण्यासाठी तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत.

Related Articles

Related image1
Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं आता टेन्शन फ्री! मध्य रेल्वेच्या १७६ 'समर स्पेशल' गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Related image2
Konkan Railway Special Train: कोकण रेल्वे मार्गावर धावणार 'स्पेशल' ट्रेन! पनवेलसह 'या' महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा; प्रवाशांची गर्दी होणार कमी
34
१२ लाख वाहनांसमोर मोठे आव्हान
Image Credit : twitter

१२ लाख वाहनांसमोर मोठे आव्हान

महानगर गॅसच्या कार्यक्षेत्रात सध्या सुमारे १२ लाख सीएनजी गाड्या धावत आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या टॅक्सी आणि रिक्षांची आहे. जर सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाला, तर मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती ऑटो-टॅक्सी संघटनांनी व्यक्त केली आहे. अनेक चालकांनी खबरदारी म्हणून आत्तापासूनच पंपांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

44
युद्धाचा थेट फटका
Image Credit : social media

युद्धाचा थेट फटका

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे दर युद्धामुळे अस्थिर झाले आहेत. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा फटका थेट स्थानिक वितरणाला बसत आहे. यामुळे येत्या दिवसांत मुंबईकरांना आपली वाहने घरीच उभी करून पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Recommended image2
Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Recommended image3
Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू
Recommended image4
Mumbai Road Rage : मुंबईत राँग साईडने येऊन महिलेला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल
Recommended image5
Ashish Shelar: ठाकरेंचा मोर्चा म्हणजे 'लंगूर मोर्चा', शेलारांची खोचक टीका
Related Stories
Recommended image1
Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं आता टेन्शन फ्री! मध्य रेल्वेच्या १७६ 'समर स्पेशल' गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Recommended image2
Konkan Railway Special Train: कोकण रेल्वे मार्गावर धावणार 'स्पेशल' ट्रेन! पनवेलसह 'या' महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा; प्रवाशांची गर्दी होणार कमी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved