MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • MHADA Mumbai New Hostel: मुंबईत शिकायचंय किंवा नोकरी करायचीय? आता राहण्याचं टेन्शन विसरा; म्हाडा देणार 'दिवाळी गिफ्ट'!

MHADA Mumbai New Hostel: मुंबईत शिकायचंय किंवा नोकरी करायचीय? आता राहण्याचं टेन्शन विसरा; म्हाडा देणार 'दिवाळी गिफ्ट'!

MHADA Mumbai New Hostel: मुंबईतील काळाचौकी येथे म्हाडा ५०० विद्यार्थ्यांसाठी, नोकरदारांसाठी १८ मजली वसतिगृह बांधत आहे. या प्रकल्पाचे ९०% काम पूर्ण झाले असून दिवाळीपर्यंत हे वसतिगृह सुरू होईल, ज्यामुळे मुंबईत येणाऱ्या तरुणांना स्वस्त निवारा मिळेल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 11 2026, 04:12 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईत शिकायचंय किंवा नोकरी करायचीय? आता राहण्याचं टेन्शन विसरा
Image Credit : Twitter

मुंबईत शिकायचंय किंवा नोकरी करायचीय? आता राहण्याचं टेन्शन विसरा

मुंबई: स्वप्नांच्या या शहरात शिक्षणासाठी किंवा हक्काच्या रोजगारासाठी येणाऱ्या तरुणाईसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे 'राहणार कुठे?'. मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती आणि हॉस्टेलची टंचाई यामुळे अनेक विद्यार्थी हतबल होतात. मात्र, आता या समस्येवर म्हाडा (MHADA) ने एक जबरदस्त तोडगा काढला असून, मुंबईत येणाऱ्या तरुण-तरुणींना हक्काचा आणि सुरक्षित आसरा मिळणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
काळाचौकीत उभी राहतेय १८ मजली आलिशान इमारत
Image Credit : Twitter

काळाचौकीत उभी राहतेय १८ मजली आलिशान इमारत

मुंबईतील काळाचौकी येथील जिजामाता नगर मध्ये म्हाडाने एका भव्य १८ मजली वसतिगृहाचे (Hostel) काम हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचे ९०% काम पूर्ण झाले असून, येत्या दिवाळीपर्यंत हे वसतिगृह विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. सात वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. 

Related Articles

Related image1
Pune Mumbai Missing Link: घाटातील ट्रॅफिक विसरा! पुणे-मुंबई मिसिंग लिंक ९८% पूर्ण; पण 'या' वाहनांना एन्ट्री मिळणार नाही?
Related image2
PM Kisan Yojana: 'पीएम किसान'चे हप्ते थांबणार? ६१ हजार शेतकऱ्यांच्या घरी धाड पडणार; प्रशासनाचा मोठा निर्णय!
35
काय आहेत या वसतिगृहाची वैशिष्ट्ये?
Image Credit : Twitter

काय आहेत या वसतिगृहाची वैशिष्ट्ये?

हे केवळ एक वसतिगृह नसून आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले एक कॉम्प्लेक्स असणार आहे.

क्षमता: या इमारतीत सुमारे ५०० तरुण-तरुणींची राहण्याची उत्तम सोय केली जाणार आहे.

व्यावसायिक सोयी: १८ मजली इमारतीच्या पहिल्या ५ मजल्यांवर व्यावसायिक गाळे असतील. यामुळे विद्यार्थ्यांना बँक, स्टेशनरी किंवा इतर जीवनावश्यक सुविधांसाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही.

मोक्याचे ठिकाण: साधारण १५,००० चौरस मीटर जागेवर हे वसतिगृह विस्तारले असून, मध्य मुंबईत असल्याने प्रवासासाठी हे अत्यंत सोयीचे ठरेल.

म्हाडाचा पहिला प्रयोग: मुंबईतील म्हाडाचे हे पहिलेच अधिकृत वसतिगृह ठरणार आहे, जे सामाजिक बांधिलकी जपत मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधले जात आहे. 

45
महत्वाची टीप
Image Credit : Twitter

महत्वाची टीप

२०२२ मध्ये सुरू झालेले हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत नवीन स्वप्न घेऊन येणाऱ्या युवकांसाठी हे म्हाडाचे मोठे 'रिटर्न गिफ्ट' मानले जात आहे. 

55
विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा दिलासा
Image Credit : our own

विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा दिलासा

खाजगी पेइंग गेस्ट (PG) किंवा हॉस्टेलचे अव्वाच्या सव्वा दर परवडत नसल्याने अनेक गुणवंत विद्यार्थी मुंबईत येण्यास कचरतात. मात्र, म्हाडाच्या या पुढाकारामुळे आता सुरक्षितता आणि स्वस्त दरातील निवारा या दोन्ही गोष्टी एकाच छताखाली मिळणार आहेत.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Weather Update : राज्यभरात पावसाचा जोर वाढणार, पुढील ४ दिवस मुसळधार
Recommended image2
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टर करणार, महाराष्ट्रातील ओपीडी २० जुलै रोजी बंद राहणार
Recommended image3
महेश ट्युटोरियल्सची 33 केंद्रे अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला
Recommended image4
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! उघड्या नाल्यांबाबत 179 तक्रारी अजूनही प्रलंबित
Recommended image5
Tukaram Mundhe effect | पारशी डेअरीच्या रेडमध्ये दिसले इतर कंपन्यांचे रिफांईंड ऑईल आणि तूप
Related Stories
Recommended image1
Pune Mumbai Missing Link: घाटातील ट्रॅफिक विसरा! पुणे-मुंबई मिसिंग लिंक ९८% पूर्ण; पण 'या' वाहनांना एन्ट्री मिळणार नाही?
Recommended image2
PM Kisan Yojana: 'पीएम किसान'चे हप्ते थांबणार? ६१ हजार शेतकऱ्यांच्या घरी धाड पडणार; प्रशासनाचा मोठा निर्णय!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved