सार

Parking Rules And Regulations In Mumbai : रस्त्याच्या कडेला अवैधरित्या गाडी पार्क करणाऱ्यांवर आता मुंबई महापालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

Parking Rules And Regulations In Mumbai : रस्त्याच्या कडेला किंवा अन्य वाहनांना वाहतुकीस अडथळे निर्माण होतील, अशा पद्धतीने गाडी पार्क करण्याची सवय तुम्हाला देखील आहे. तर मग वेळीच सावध व्हा. कारण या सवयीमुळे तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अवैधरित्या गाडी पार्क (Illegal Parking Mumbai)  करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) घेतला आहे. 

विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांवर उचलबांगडीची कारवाई आता वाहतूक पोलीस (Mumbai Traffic Police) नव्हे तर महापालिकेचे मार्शल (BMC Marshals) करणार आहेत. यासाठी विभाग स्तरावर मार्शलची नियुक्ती करण्याचाही निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिका करणार मार्शलची नियुक्ती

मार्शलच्या नियुक्तीचे कार्य पूर्ण झाल्यानंतर मार्गदर्शक तत्ते जारी केली जातील, असे म्हटले जात आहे. काही जणांना रस्त्याच्या कडेला अवैध पद्धतीने गाड्या पार्क करण्याची सवय असते, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीचीही समस्या उद्भवते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी या समस्येची दखल घेतली आहे. वाहतूक कोंडी (Mumbai Illegal Parking Issue), वाहनांच्या आसपास असणारी अस्वच्छता इत्यादी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मार्शलची नेमणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यानुसार विभाग पातळीवर मार्शलची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. 

संपूर्ण स्वच्छता मोहीम

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला होता. यानुसार जानेवारी 2024 पर्यंत प्रत्येक शनिवारी ‘डीप क्लिनिंग’ मोहिमेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. प्रत्येक परिमंडळात एक विभाग याप्रमाणे सात विभागांमध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबवली जाईल.

या विशेष मोहिमेअंतर्गत रस्‍ते-पदपथ धूळमुक्‍त करण्‍याबरोबरच बेवारस वाहनांची विल्‍हेवाट लावणे, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्‍वच्‍छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा राखणे, निर्मळ कर्मचारी वसाहत, फेरीवाला विरहीत क्षेत्र, राडारोडामुक्‍त परिसर आदी गोष्टींची कार्यवाही केली जाणार आहे.

आणखी वाचा

Mumbai : 9 डिसेंबरपासून दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म्संना मिळणार नवे क्रमांक, गोंधळ होण्यापूर्वी वाचा सविस्तर माहिती

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नव्या महामारीचा धोका वाढतोय, महाराष्ट्रासह या राज्यांतही अ‍ॅलर्ट जारी

इन्फ्लूएंझा किंवा सीझनल फ्लूची लक्षणे आढळल्यास काय करावे व काय करू नये?