बायोफार्मा शक्ती योजना: बजेट २०२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. बायोफार्मा शक्ती योजनेअंतर्गत कर्करोग, मधुमेह आणि ऑटोइम्यून डिसऑर्डरची औषधे स्वस्त होतील. जाणून घ्या या योजनेचे फायदे.
- Home
- India
- Budget 2026 Expectations Live Update : इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही - अर्थमंत्री निर्मला सीतारमण
Budget 2026 Expectations Live Update : इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी आज (रविवारी, ३१ जानेवारी २०२६) अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांचा ९ वा अर्थसंकल्प आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. जाणून घ्या कोणकोणत्या घोषणा केल्या.
Budget 2026 Expectations Live Update:बजेट २०२६: बायोफार्मा शक्ती योजना काय? जाणून घ्या १०,००० कोटींची योजना
Budget 2026 Expectations Live Update:शेअर मार्केटच्या निर्देशांकात ८०० अंशांची तर निफ्टीमध्ये ३०० अंकांची घसरण
शेअर मार्केटच्या निर्देशांकात ८०० अंशांची तर निफ्टीमध्ये ३०० अंकांची घसरण झाली आहे. सध्या अर्थमंत्री निर्मला सीतारण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Budget 2026 Expectations Live Update:कॅन्सवरील १७ औषधांवरील आयात शुक्लात कपात
- कॅन्सवरील १७ औषधांवरील आयात शुक्लात कपात
- सौरउर्जेवरील उपकरणे स्वस्त होणार
- पादत्राणे, बॅटरी आणि मायक्रो ओव्हन स्वस्त होणार
- चामडे आणि कापड उद्योगावरील निर्यात शुल्कात कपात
Budget 2026 Expectations Live Update:शेअर मार्केटमधील ऑप्शन ट्रेडिंगवरच्या करात वाढ
शेअर मार्केटमधील ऑप्शन ट्रेडिंगवरच्या करात वाढ करण्यात येणार आहे. यामुळे शेअर मार्केटमध्ये घसरण झालेली पहायला मिळत आहे.
Budget 2026 Expectations Live Update:क्लाऊड सर्विसेस देणाऱ्या परदेशी कंपन्यांना २०४७ पर्यंत करमुक्ती
क्लाऊड सर्विसेस देणाऱ्या परदेशी कंपन्यांसाठी २०४७ पर्यंत करमुक्तीची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
Budget 2026 Expectations Live Update:टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नव्हे तर दंड ठोठावला जाणार
टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नव्हे तर दंड ठोठावला जाणार आहे. याशिवाय अषोघित संपत्तीसाठी देखील हाच नियम लागू असेल.
Budget 2026 Expectations Live Update:आयटीआर रिर्टन ३१ जुलैपर्यंत दाखल करू शकणार
आयटीआर रिर्टन ३१ जुलैपर्यंत दाखल करू शकणार असल्याचे अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.
Budget 2026 Expectations Live Update:नव्या इन्कम टॅक्सची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून करणार - अर्थमंत्री
नव्या इन्कम टॅक्सची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून करणार आहेत. तर अपघात विम्यावर मिळणाऱ्या रक्कमेवर कोणताही टॅक्स लावला जाणार नाहीये.
Budget 2026 Expectations Live Update:पुढल्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या ४.३ टक्के राहिल - अर्थमंत्री
पुढल्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या ४.३ टक्के राहिल असा अंदाज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केला आहे. तर चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ४.४ टक्के राहिल असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
Budget 2026 Expectations Live Update:लखपती दीदी बनवण्यामागे नवी पावले टाकणार - अर्थमंत्री
लखपती दीदी बनवण्यामागे नवी पावले टाकणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच दिव्यांगजनांना अधिक सक्षम बनवण्यासाठी दिव्यांग सहारा योजना राबवली जाणार आहे.
Budget 2026 Expectations Live Update:दशकभरासाठी खलो इंडिया मिशनी अर्थमंत्र्यांकडून घोषणा
दशकभरासाठी खलो इंडिया मिशनी अर्थमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली आहे. या मिशनद्वारे क्रीडा क्षेत्राचे रुप बदलून टाकण्यासह नवी क्रीडा संकुले उभारली जाणार आहेत.
Budget 2026 Expectations Live Update:कंटेंट क्रिएशन लॅब उभारली जाणार - निर्मला सीतारमण
कंटेंट क्रिएशन लॅब (Content Creation Lab) भारतातील अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्रात २०३० पर्यंत सुमारे २० लाख (२ मिलियन) व्यावसायिकांची गरज भासण्याची शक्यता आहे.हे उद्दिष्ट लक्षात घेऊन, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज' (मुंबई) च्या सहकार्याने देशभरातील १५,००० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये 'AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स' स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
Budget 2026 Expectations Live Update:देशात ७ हाय स्पीड कॉरिडोअर उभारले जाणार -अर्थमंत्री
देशात सात हाय स्पीड कॉरिडोअर उभारले जाणार आहे. याचा मार्ग मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरु, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळुरु, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुरी असा असणार आहे.
Budget 2026 Expectations Live Update:आयुर्वेदाचे शिक्षण देणाऱ्या तीन नव्या संस्था स्थापन करणार - अर्थमंत्री
आयुर्वेदाचे शिक्षण देणाऱ्या तीन नव्या संस्था स्थापन करणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.तर पशूवैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य करणार आहेत. सोबतच आयुर्वेदाचे शिक्षण देणाऱ्या तीन नव्या संस्था स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Budget 2026 Expectations Live Update:५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरातील पायाभूत सुविधा वाढवणार - अर्थमंत्री
५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरातील पायाभूत सुविधा वाढवण्यासह त्यासाठी फंडाची स्थापना करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच १२.२ लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरले जाणार आहेत.
Budget 2026 Expectations Live Update:वस्रोद्योग आणि हस्तकला उद्योगाला चालना देणार - अर्थमंत्री
वस्रोद्योग आणि हस्तकला उद्योगाला चालना देण्यासग हातमागासाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज्य अभियान राबणार आहे. याशिवाय मेगा टेक्ससाइलची उभारणी करणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
Budget 2026 Expectations Live Update:बायोफार्मा शक्तीसाठी १० हजार कोटींची तरतूद - अर्थमंत्री निर्मला सीतारमण
बायोफार्मा शक्तीसाठी १० हजार कोटींची तरतूद करत आहोत असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे. याशिवाय तीन मोठ्या केमिकल पार्कची स्थापन करणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
Budget 2026 Expectations Live Update:मधुमेह, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी स्वस्त औषधे उपलब्ध करू - अर्थमंत्री
मधुमेह, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी स्वस्त औषधे उपलब्ध करू असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे.
Budget 2026 Expectations Live Update: देशाच्या आर्थिक वाटचालीत स्थिरता, वित्तीय शिस्त, शाश्वत वाढ आणि मध्यम महागाई दिसून आली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण
२०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "आम्ही १२ वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यापासून, देशाच्या आर्थिक वाटचालीत स्थिरता, वित्तीय शिस्त, शाश्वत वाढ आणि मध्यम महागाई दिसून आली आहे. अनिश्चितता आणि अडथळ्यांच्या काळातही आम्ही घेतलेल्या जाणीवपूर्वक निर्णयांचा हा परिणाम आहे."
Budget 2026 Expectations Live Update:केंद्रीय मंत्रीमंडळाकडून अर्थसंकल्प २०२६-२७ ला मंजूरी
केंद्रीय मंत्रीमंडळाकडून अर्थसंकल्प २०२६-२७ ला मंजूरी मिळाली आहे.