सार

मुंबईकरांना संपूर्ण आठवडाभर उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. सोमवारी शहरातील आर्द्रता पातळी 73 टक्के आणि उपगनरांमध्ये 58 टक्के असल्याची नोंद करण्यात आली.

Mumbai Weather Update :  मुंबईकरांना कडक उन्हाच्या झळा आठवडाभर बसणार आहेत. कारण मुंबईतील महानगरांमधील तापमान 37 डिग्री सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता आहे. दिवसभर उन्हामुळे अंगाची ल्हाईल्हाई होईल पण रात्रीही गरम होणार आहे. शहरातील तापमानाचा पारा 24 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशातच नागरिकांनी पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरूवातीलाचा सकाळचे तापमान 38 डिग्री सेल्सिअसच्या पार गेल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, 22 मार्चनंतर मुंबईतील तापमान घट झाल्याचे दिसून आले. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. पण पुन्हा मुंबईतील तापमान वाढणार आहे.

हवामान तज्ज्ञांनी वर्तवला तापमानाचा अंदाज
हवामान तज्ज्ञ ऋषिकेश आग्रे यांनी म्हटले की, येणाऱ्या एक-दोन दिवसात शहरातील अधिकाधिक तपामान 37 डिग्री सेल्सिअस आणि कमीतकमी तापमान 24-25 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्यास समुद्राच्या दिशेने उष्ण वारे वाहणार आहेत.

कडक उन्हामुळे आरोग्या संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता
कडक उन्हामुळे मुंबईकरांना आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तापमानातील आद्रतेमुळे अंगाची ल्हाईल्हाई होणार असून शरिरातील पाण्याचा स्तर कमी झाल्यास डिहाइड्रेशनची समस्या वाढू शकते. याशिवाय स्ट्रोकचाही धोका उद्भवू शकते.

उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

  • कडक उन्हात विनाकारण घराबाहेर पडणे टाळा.
  • डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दीर राहण्यासाठी द्रव पदार्थांचे सेवन करा.
  • तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करा.
  • सॅलड किंवा फळांचे अधिकाधिक सेवन करा.
  • पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
  • आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांना भेटा.
  • कडक उन्हात टोपी, चश्मा, सूती कपडे आणि सनस्क्रिन लोशन लावण्यास विसरू नका.

आणखी वाचा : 

Mumbai : होळीच्या दिवशी माहिम बीचवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी एकाचा बु़डून मृत्यू, अन्य एकजण बेपत्ता

मुंबईतील राणीबागेत वर्ष 2022-23 दरम्यान 40 पशूंचा मृत्यू, रिपोर्टमधून खुलासा

मलाड येथे 15 फूट खोल गटारात पडून परिवारातील दोन जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक