सार

मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी (20 जुलै) रात्रीपासून स्पेशल ब्लॉक असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गाड्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पेशल ब्लॉकचा परिणाम मुख्य मार्गावर होणार आहे.

Mumbai Block Update : मध्य रेल्वेकडून शनिवारी रात्री स्पेशल ब्लॉकची सूचना नागरिकांसाठी जाहीर केली आहे. स्पेशल ब्लॉक कर्नाक बंदर ब्रिजवर गर्डर घालण्यात येणार असल्याने घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाक बंदर गर्डर घालण्याआधी 800 मॅट्रिक टनचे एअरड्रॉप रोड क्रेनद्वारे विशेष पोर्टल बूम लावणे आणि जुने एंकर हटवण्याच्या कामासाठी स्पेशल ब्लॉक घेतला जात आहे.

ब्लॉकबद्दल मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली सूचना
20/21 जुलै, शनिवारच्या मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून ते पहाटे 4.30 मिनिटांपर्यंत स्पेशल ब्लॉक असणार आहे. यावेळी मुख्य मार्गावरील भायखळा आणि सीएसएमटीदरम्यान अप आणि डाउन स्लो लाइन, अप आणि डाउन फास्ट मार्गावर ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर वडाळा रोड आणि सीएसएमटीदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर स्पेशल ब्लॉक असणार आहे.

ब्लॉकदरम्यान गाड्यांचे वेळापत्रक
स्पेशल ब्लॉकदरम्यान, मुख्य मार्गावरील भायखळा आणि सीएसएमटी व हार्बर मार्गावर वडाळा रोड आणि सीएसएमटीदरम्यान उपनगरीय सेवा बंद राहणार आहे. मुख्य मार्गावर अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परेल, ठाणे आणि कल्याण स्ठानकांवर थोड्यावेळासाठी बंद अथवा वळवल्या जातील. हार्बर मार्गावर अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा स्थानकावरही थोड्या वेळासाठी बंद अथवा वळवल्या जाणार आहेत.

या ट्रेनच्या वेळापत्रकांवरही द्या लक्ष

  • डाउन स्लो मार्गावर अखेरची लोक कसारा एन-1 सीएसएमटी येथून रात्री 00.14 वाजता सुटणार असून कसारा येथे 03.00 वाजता पोहोचणार आहे.
  • अप स्लो मार्गावरील अखेरची लोकल कर्जत एस-52 कल्याण येथून 22.34 मिनिटांनी रात्री 10.30 मिनिटांनी सुटणार असून सीएसएमटी स्थानकात रात्री 00.06 वाजेपर्यंत पोहोचणार आहे.
  • डाउन फास्ट मार्गावर पहिली लोकल एस-3 सीएसएमटी येथून 04.07 मिनिटांनी सुटणार असून कर्जत स्थानकात सकाळी 06.07 वाजता पोहोचणार आहे.
  • अप स्लो मार्गावरील पहिली लोकल टी-2 ठाणे येथून 04.00 वाजता सुटणार असून सीएसएमटी स्थानकात पहाटे 04.56 वाजता पोहोचणार आहे.

मध्य रेल्वेकडून लोकलसंदर्भात आजचे अपडेट्स
हवामान खात्याने मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अशातच मध्य रेल्वेकडून लोकलसंदर्भातील अपडेट्स जारी करण्यात आले आहेत. यानुसार, मुख्य मार्गावरील सीएसएमटी-कल्याण/कर्जत/खोपोली/ कसारा येथील मार्गावरील रेल्वेसेवा सुरु आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल/गोरेगाव मार्गावरील सेवाही सुरु असून ट्रान्स हार्बर मार्ग ठाणे ते वाशी/पनवेल आणि चौथा कोरिडोअर बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्गावरील देखील वाहतूक सुरु आहे. मध्य रेल्वेसंदर्भातील लोकलचे वेळापत्रक, गाड्या रद्द अथवा स्पेशल ट्रेनसाठी www.enquiry.indianrail.gov.in येथे अथवा NTES App डाउनलोड करावे.

आणखी वाचा : 

मुंबईसह कोकण किनारपट्टीत 200 ते 500 मिमी पाऊस पडणार, हवामान खात्याचा इशारा

मुंबई मेट्रो-3च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, तावडेंनी ट्विट करुन दाखवली पहिली झलक