मुंबईसह कोकण किनापट्टीत 200 ते 500 मिमी पाऊस पडणार, हवामान खात्याचा इशारा

| Published : Jul 18 2024, 02:39 PM IST

Rain

सार

Konkan And Mumbai IMD Alert : हवामान विभागाने परदेशी हवामान संस्थेचा नकाशा सादर करीत मुंबई आणि कोकणात मोठा पाऊस येण्याचा इशारा दिला आहे.

 

Konkan And Mumbai IMD Alert : आयएमडीने कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या काही तासात कोकण किनारपट्टी, कोकण घाटमाथा येथे काही ठिकाणी 200 एमएम ते 500 एमएम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. या पावसाचा जोर शुक्रवारी देखील राहणार आहे. कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचा इशारा दिल्याने मुंबई कोकण विभागात मोडत असल्याने मुंबईकरांना सावधान रहावे अशी परिस्थिती आहे. हवामान विभागाचे गेले काही अंदाज खोटे ठरल्याने यावेळी हवामान विभागाने सावध भूमिका घेत अलर्ट जारी केला असला तरी राज्य सरकारकडून काही सूचना दिलेल्या नाहीत. परंतू पावसाने मुंबईतील जीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हवामान विभागाचे संशोधक कृष्णानंद होसाळीकर यांनी साऊथ एशियाचा जगाचा नकाशा ट्वीट केला आहे. यात साऊथ एशियात भारत येत असल्याने भारताच्या नकाशावर कोकण आणि मुंबईची किनार पट्टी येथे जोरदार म्हणजे 200 ते 500 एमएम पाऊस पडले असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्यावेळी 8 जुलैला मुंबई आणि कोकणात पावसाने धूमशान घातले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 9 जुलै रोजी देखील जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला. आणि राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली होती. परंतू 9 जुलै रोजी प्रत्यक्षात ऊन पडल्याने हवामान खात्याच्या अंदाजाविषयी सर्वत्र हसे झाले होते.

 

 

हवामान विभाग कोणताही अलर्ट देताना तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल असा अंदाज वर्तवित असते. त्यामुळे त्या काळात कोणत्यातरी आयसोलेटेट ठिकाणी पाऊस पडलेला असतो. परंतू आयएमडीचे संशोधक होसाळीकर यांनी आता @metoffice या परदेशी संकेत स्थळाचे ट्वीट रि ट्वीट केले आहे. त्यात आशियातील साऊथ आणि साऊथ ईस्टर्न भागात पुढील आठवड्यातही अतिमुसळधार वृष्टी होऊ शकते असे म्हटले आहे. साऊथ इंडिया 700 एमएम पाऊस होऊ शकतो असे या नकाशा दर्शविले आहे.

 

 

कमी दाबाचा पट्टा सक्रीय

समुद्र सपाटी लगत किनाऱ्यावर असणारा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ दरम्यान सक्रीय झाला आहे. गुरुवारी कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाण तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात 18 जुलैला रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पुढील तीन चार दिवस तुरळक ठिकाणांवर खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

घाट विभागात खूप जोरदार पाऊस

मध्य महाराष्ट्रात पुणे 18 जुलैला, साताऱ्यात 18 ते 20 जुलैला घाट विभागात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा घाटमाथा येथे ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने तिथे यलो अलर्ट दिला. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आणखी वाचा :

रीलच्या नादात सुमारे 300 फूट खोल दरीत पडून रील स्टार अन्वी कामदारचा मृत्यू