Central Railway Block : कर्जत यार्ड पुनर्बांधणी आणि आधुनिक सिग्नल बसवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे रविवार आणि सोमवारी अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द तर काही केवळ पुण्यापर्यंतच धावणार आहेत.
Central Railway Block : कर्जत रेल्वे यार्डच्या पुनर्बांधणीसह आधुनिक सिग्नल प्रणालीच्या (Modern Signalling System) स्थापनेसाठी मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक रविवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 7:20 ते सायंकाळी 6:20 वाजेपर्यंत आणि सोमवारी (13 ऑक्टोबर) सकाळी 11:20 ते दुपारी 2:20 वाजेपर्यंत पळसदरी ते भिवपुरी विभागात राहणार आहे.
ब्लॉकदरम्यान अनेक गाड्या रद्द
या विशेष ब्लॉकमुळे रविवारी धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द राहणार आहेत. यामध्ये (12125/26) सीएसएमटी–पुणे–सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस,(12123/24) डेक्कन क्वीन, (11009/10) सिंहगड एक्स्प्रेस, (22225/26) सीएसएमटी–सोलापूर–सीएसएमटी वंदे भारत, (11011/12) सीएसएमटी–धुळे–सीएसएमटी, (11008) सीएसएमटी–पुणे डेक्कन, (17613) पनवेल–नांदेड, (12127) सीएसएमटी–पुणे इंटरसिटी, (22105) सीएसएमटी–पुणे इंद्रायणी या गाड्यांचा समावेश आहे.
काही गाड्या केवळ पुण्यापर्यंतच धावणार
या ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांची सेवा मर्यादित करण्यात आली आहे. (18519) विशाखापट्टणम्–लोकमान्य टिळक,(11140) होस्पेट–सीएसएमटी, (12116) सोलापूर–सीएसएमटी या गाड्या फक्त पुणे स्थानकापर्यंतच धावतील, तर पुणे–मुंबईदरम्यानचा प्रवास रद्द राहील.
१२ मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम
या ब्लॉकमुळे एकूण १२ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुढील गाड्यांचा कर्जत थांबा वगळण्यात आला आहे: (11020) भुवनेश्वर–सीएसएमटी, (17412) कोल्हापूर–सीएसएमटी, (22144) बिदर–सीएसएमटी, (11008) पुणे–सीएसएमटी, (22943) दौंड–इंदूर, (22106) पुणे–सीएसएमटी, (11090) भगत की कोठी, (17614) नांदेड–पनवेल, (12126) पुणे–सीएसएमटी इत्यादी.
प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचे आवाहन
मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आणि आवश्यक असल्यास पर्यायी नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. या ब्लॉकच्या कामामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि आधुनिक होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.


