- Home
- Mumbai
- Mumbai Metro Diwali Schedule Update: दिवाळीपूर्वी मुंबई मेट्रोचा मोठा बदल! प्रवाशांचे आठवडाभर ‘मेगाहाल’, नवं वेळापत्रक जाणून घ्या
Mumbai Metro Diwali Schedule Update: दिवाळीपूर्वी मुंबई मेट्रोचा मोठा बदल! प्रवाशांचे आठवडाभर ‘मेगाहाल’, नवं वेळापत्रक जाणून घ्या
Mumbai Metro Diwali Schedule Update: १२ ते १८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान, मुंबई मेट्रोच्या मार्गिका 2A आणि 7 वरील सकाळच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार आहेत. मार्गिका 7 आणि 9 च्या जोडणीच्या आणि प्रणाली एकत्रीकरणाच्या कामामुळे काही सेवा उशिराने सुरू होतील.

१२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात मोठा बदल
मुंबई: दिवाळीच्या आधीच मेट्रो प्रवाशांना एक आठवड्याचा "मेगाहाल" सहन करावा लागू शकतो. १२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुंबई मेट्रोच्या मार्गिका 2A (दहिसर – डीएन नगर) आणि मार्गिका 7 (दहिसर ईस्ट – अंधेरी ईस्ट) वर सकाळच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार आहेत.
एमएमआरडीए (MMRDA) कडून दिलेल्या माहितीनुसार, या काळात मार्गिका 7 आणि 9 (पहिला टप्पा) यांचं जोडणीचं आणि अत्यावश्यक प्रणाली एकत्रीकरणाचं (System Integration) काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही मेट्रो सेवा सकाळच्या वेळात थोडा उशिराने सुरु होतील.
ही तांत्रिक कामं अंधेरी (पूर्व) ते मिरा-भाईंदर दरम्यान करण्यात येणार असून, प्रवाशांच्या दीर्घकालीन सोयीसाठी ही महत्त्वाची पायरी आहे. एकदा हे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना अधिक सुसज्ज, जलद आणि अखंड सेवा मिळणार आहे.
सुधारित मेट्रो वेळापत्रक (१२ ते १८ ऑक्टोबर २०२५)
मार्ग दिवस पहिली ट्रेन (वेळ)
गुंदवलीकडे जाणारी सोम-शुक्र सकाळी ०७:०१
शनिवार सकाळी ०७:००
रविवार सकाळी ०७:०४
अंधेरी पश्चिमकडे जाणारी सोम-शुक्र सकाळी ०७:०६
शनिवार सकाळी ०६:५८
रविवार सकाळी ०६:५९
दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम सर्व दिवस सकाळी ०७:०२
दहिसर (पूर्व) ते गुंदवली सोम-शुक्र सकाळी ०६:५८
शनिवार सकाळी ०७:०६
रविवार सकाळी ०७:०१
सुधारित मेट्रो वेळापत्रक (१२ ते १८ ऑक्टोबर २०२५)
अंधेरी पश्चिम ते गुंदवली सोम-शुक्र सकाळी ०७:०१
शनिवार सकाळी ०७:०२
रविवार सकाळी ०७:०४
गुंदवली ते अंधेरी पश्चिम सोम-शुक्र सकाळी ०७:०६
शनिवार सकाळी ०७:०२
रविवार सकाळी ०७:००
प्रवाशांसाठी महत्वाची सूचना 📅 १२ ते १८ ऑक्टोबर २०२५ | 📍 मेट्रो मार्गिका २अ आणि ७ च्या सकाळच्या वेळापत्रकात बदल
मेट्रो मार्गिका ७ आणि मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा) या दोन मार्गिकांना एकत्र जोडणीची कामं आणि अत्यावश्यक प्रणाली एकीकरण (system integration) तसंच सुरक्षा चाचण्या… pic.twitter.com/RvzHXUpyDr
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) October 11, 2025
सेवा कधी पूर्ववत होणार?
एमएमआरडीएने स्पष्ट केलं आहे की, १९ ऑक्टोबर २०२५ पासून मेट्रो सेवा नियमित वेळापत्रकानुसार पूर्ववत सुरू होणार आहे. तोपर्यंत प्रवाशांनी नव्या वेळापत्रकानुसार आपल्या प्रवासाची आखणी करावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
शेवटचं सांगायचं झालं तर...
दिवाळीच्या तोंडावर मेट्रो प्रवासात थोडेसे बदल आले असले, तरी हे बदल भविष्यातील अधिक चांगल्या आणि अखंड सेवा देण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांनी थोडं संयम बाळगणं गरजेचं आहे.

