- Home
- Mumbai
- मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २,५०० घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' दिवशी निघणार जाहिरात
मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची २,५०० घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' दिवशी निघणार जाहिरात
MHADA Mumbai lottery 2026: म्हाडाच्या २,५०० घरांची सोडत एप्रिल २०२६ मध्ये जाहीर होणारय. गोरेगाव, विक्रोळी, बोरिवली, पवईसारख्या ठिकाणी घरे उपलब्ध असली तरी अल्प, मध्यम गटातील घरांच्या किमती कोटींच्या घरात गेल्याने सर्वसामान्यांसाठी हे आव्हान ठरू शकते.

मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार!
मुंबई: मुंबईत स्वत:चं हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो मुहूर्त अखेर ठरला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाची बहुप्रतिक्षित घरांची सोडत लवकरच जाहीर होणार असून, एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
२,५०० घरांचा धमाका, पण खिशाला बसणार चाट!
म्हाडा यंदा मुंबईतील विविध प्राइम लोकेशन्सवर तब्बल २,५०० घरांसाठी ही सोडत काढत आहे. मात्र, यावेळी घरांच्या किमती पाहता सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हाडाची घरे आता पूर्वीसारखी स्वस्त राहिली नसून, 'अल्प' आणि 'मध्यम' गटातील घरांच्या किमतीही कोटींच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळे ही लॉटरी प्रामुख्याने मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी फायदेशीर ठरेल असे चित्र दिसत आहे.
कुठे आणि किती मिळणार घरे? (अंदाजे तपशील)
यंदाच्या सोडतीत मुंबईतील गोरेगावपासून ते पवईपर्यंत अनेक भागांचा समावेश आहे. पाहा कुठे किती घरे उपलब्ध आहेत.
ठिकाण,उत्पन्न गट,घरांची संख्या,अंदाजे किंमत
गोरेगाव (पत्राचाळ),अल्प गट,८५ घरे,₹१.०३ कोटी
विक्रोळी (कन्नमवार नगर),मध्यम गट,१२२१ घरे,-
बोरिवली आणि पवई,उच्च गट,मोजकी घरे,₹१.५ कोटी ते ₹२.५ कोटी
इतर ठिकाणे,"मुलुंड, चेंबूर, अंधेरी, शीव",मर्यादित घरे,
पत्राचाळीतील घरांची प्रतीक्षा कायम
गेल्या वर्षी म्हाडाने ५,००० घरांची घोषणा केली होती, परंतु पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील २,५०० घरांचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्याने ही घरे या सोडतीतून वगळण्यात आली आहेत. परिणामी, आता केवळ अडीच हजार घरांसाठीच अर्ज भरता येणार आहेत.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
अत्यल्प गट: या गटासाठी मुबलक घरे उपलब्ध असणार आहेत.
उच्च गट: बोरिवली आणि पवईमध्ये आलिशान घरांचा पर्याय.
मध्यम गट: विक्रोळीत सर्वाधिक घरे उपलब्ध असल्याने या गटातील अर्जदारांना मोठी संधी आहे.
जर तुम्हीही मुंबईत घराच्या शोधात असाल, तर आतापासूनच कागदपत्रांची जुळवाजुळव आणि आर्थिक नियोजन करून ठेवा. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध होईल.

