सार

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात असणाऱ्या एका झोपडपट्टीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Gas Cylinder Blast : अँटॉप हिलमधील एका झोपडपट्टीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी (25 एप्रिल) घडली. या दुर्घटनेत एका 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याआधी अशी माहिती समोर आली होती की, दोन जण जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले आहे. 

बुधवारी रात्रीच आणखी एक आगीची घटना
बुधवारी (24 एप्रिल) रात्री अँटॉप हिल येथील जय महाराष्ट्र नगर येथील इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या दुर्घटनेत एका 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले की, दुमजली इमारतीच्या खाली असलेल्या इलेक्ट्रिकच्या दुकानातील काही सामान जळले आहे.

सायन-कोळीवाड्यातही सिलेंडरचा स्फोट
सायन-कोळीवाडा परिसरातही गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दोनजण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जातेय. स्फोट झाल्यानंतर इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्रीच्या वेळेस स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : 

मुंबईतील विमानतळावर कोट्यावधींची तस्करी, नूडल्सच्या पॅकेटमधून आणले होते हिरे

MBBS चे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय मुलाची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर