MBBS चे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय मुलाची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर

| Published : Apr 13 2024, 08:08 AM IST / Updated: Apr 13 2024, 11:26 AM IST

death 01

सार

मुंबईत एका एबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलाला कमी गुण मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेची अधिक माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Mumbai : मुंबईत शुक्रवारी (12 एप्रिल) एका एबीबीएसचे (MBBS) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खरंतर, परिक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. सदर घटना सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी घटली आहे.

चारकोप येथील घटना
कांदीवलीतील चारकोप (Charkop) येथे एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. अजय झांगिड असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तो नैराश्यात होता. यामुळेच विद्यार्थ्याने राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. घटनेवेळी विद्यार्थ्याची आई घरातील दुसऱ्या खोलीत होती. (Mumbai madhil mulachi atmahayta)

पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती देत म्हटले की, आईने मुलाला गळफास लावून घेतल्याचे पाहिले. यानंतर लगेच शेजाऱ्यांसह वडिलांना याबद्दल माहिती दिली. मुलाला रुग्णालयात नेले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेत कोणाच्याही विरोधात कुटुंबियांनी तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

याआधीही दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
मुंबईत गेल्या महिन्यात एका दहावी इयत्तेतील मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. मुलाने गळफास लावून आपले आयुष्य संपवले होते. या प्रकरणात गावदेवी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. या मुलाच्या आत्महत्येमागील समोर आलेले नव्हते. याशिवाय आत्महत्येआधी कोणताही सुसाइड नोटही लिहिली नव्हती.

आणखी वाचा : 

मुंबईतील उष्माघाताचा मुलांना त्रास, जुलाब आणि उलट्यांच्या समस्यांमध्ये वाढ

हार्दिक पांड्याच्या भावाला अटक, फसवणूक आणि पैशांची हेराफेरी केल्याचा आरोप

मुंबईतील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात दररोज कारवाई करा, महापालिकेचे आदेश