सार

Mumbai : मुंबईत विमानतळावर तस्करी करण्यात येत होती. यामध्ये कोट्यावधींच्या किंमतीचा माल कस्टम विभागाने ताब्यात घेतला आहे. यामध्ये हिरे देखील सापडले आहेत.

Crime : मुंबईतील कस्टमच्या टीमने विमानतळावर 4.44 कोटी रुपयांचे सोने आणि 2.2 कोटी रुपयांचे हिरे जप्त केले आहेत. कस्टमने एकूण 6.46 कोटी रुपयांच्या तस्करीचा माल 13 वेगवेगळ्या प्रकरणात ताब्यात घेतला आहे. तस्करी करणाऱ्या व्यक्तींनी हिरे नूडल्सच्या पॅकेटमध्ये लपवून आणले होते. याशिवाय सोन्याची तस्करी पॅसेंजरच्या शरिरातून केली जात होती. आणखी एक प्रकरण असे की, एका व्यक्तीने बॅग आणि अंडरगार्मेंट्सच्या माध्यमातून सोन्याची तस्करी केली होती.

संशय न येण्यासाठी अशी केली तस्करी
रिपोर्ट्सनुसार, तस्करांनी हिरे नूडल्सच्या पॅकेटमध्ये लपवून आणले. जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. पण मुंबई विमानतळावर कस्टम तपासणीवेळी हिऱ्यांची तस्करी केली जात असल्याचे समोर आले. कस्टमने एकूण चार जणांना ताब्यात घेतले आहे. कस्टमने कोलंबो येथून मुंबईत आलेली एक परदेशी महिलेची अडवणूक केली. तिची तपासणी केली असता अंडरगार्मेंट्समध्ये 24K सोने आणि एक कापलेला तुकडा मिळाला ज्याचे वजन एकूण 321 ग्रॅम आहे.

10 जणांकडून जप्त केले 6 किलोंहून अधिक सोने
प्राप्त झालेल्या माहितीनुसार दुबई, अबू धाबी, बहरीन, दोहा, रियाद, मस्कट, बँकॉक आणि सिंगापूर अशा ठिकाणाहून आलेल्या 10 जणांची विमानतळावर अडवणूक करण्यात आली. या सर्वांची तपासणी केली असता लपवण्यात आलेले 6.199 किलोग्रॅमचे सोने जप्त केले. या सोन्याची किंमत तब्बल 4.04 कोटी रुपये आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

नूडल्सच्या पॅकेटमध्ये लपवण्यात आले होते हिरे
मुंबईहून बँकॉकला जाणाऱ्या एका व्यक्तीला विमानतळावर अडवण्यात आले. त्याची तपासणी केली असता हिरे जप्त केले. व्यक्तीने हिरे चालाखीने नूडल्सची पाकीटे आणि ट्रॉली बॅगमध्ये लपवले होते. या एकूण हिऱ्यांची किंमत 2.02 कोटी रुपये आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

RBI ची एकाचवेळी दोन बँकांवर मोठी कारवाई, खात्यातून केवळ 15 हजार रुपयांची रक्कम काढता येणार

दुकान आणि संस्थांवर मराठी बोर्ड नसल्यास Property Tax दुप्पट होणार, महापालिकेचा मोठा निर्णय