9 वर्षीय मुलीचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू, कांदिवलीतील घटना

| Published : Jul 11 2024, 09:35 AM IST / Updated: Jul 11 2024, 09:40 AM IST

Death

सार

Mumbai News : कांदिवली येथील एका इमारतीत राहणाऱ्या 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नक्की घटनेत काय घडले आणि कसा घडला अपघात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Mumbai News : कांदिवली (Kandivali) येथे एका इमारतीत राहणारी 9 वर्षीय मुलगी घराच्या गॅलरीत खेळत होती. यावेळी अचानक मुलीच्या गॅलरीमधून तोल जात ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळली गेली. सदर घटना मंगळवारी घडल्यानंतर बुधवारी मुलीला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

आशिया विश्वकर्मा (Aashiya Bishwakarma) असे मृत मुलीचे नाव असून ती दुसरी इयत्तेत शिकत होती. आशियाचे वडील मानसिंग विश्वकर्मा हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. आशिया आपल्या परिवारासोबत एका भाड्याच्या घरात राहत होती.

नक्की काय घडले?
मंगळवारी (9 जुलै) मानसिंग यांची प्रकृती बिघडल्याने आराम करत होतो. आशिया आणि तिची दोन भावंडे घराच्या बॉक्स विंडो ग्रीलमध्ये खेळत होते. यावेळी घरातील अन्य मंडळी कामासाठी घराबाहेर होती. रात्री 8 वाजल्याच्या सुमारास, मानसिंग यांना जोरात कोणीतरी ओरडल्याचा आवाज ऐकू आला. यावेळी ग्रिल तुटली होती आणि मानसिंग यांची मुलगी कुठे दिसत नव्हती. मानसिंग यांना अन्य दोन भावंडे तुटलेल्या ग्रिलला अडकल्याचे दिसून आल्याने त्या दोघांना वर काढण्यात आले. यानंतर मानसिंग यांनी आशिया इमारतीवरुन खाली कोसळल्याचे पाहिले. अशातच तातडीने धावत मानसिंग इमारतीखाली गेले. आशियाला गंभीर दुखापत झाली होती.

कांदिवली पोलिसांनी सदर घटनेबद्दल सविस्तर माहिती देत सांगितले की, आशियाच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशी खाली आले. मानसिंगने आशियाला तातडीने बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेले. आशियावर रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मिरारोड येथेही इमारतीवरुन पडल्याची दुर्घटना
काही महिन्यांआधी मिरारोड (Mira Road) येथे आपना घर फेज-3 एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदर व्यक्ती आपल्या मित्रांना बांधकामाधीन असलेल्या इमारतीच्या ठिकाणी काम करणाऱ्या मित्रांना भेटण्यासाठी आला होता. यावेळीच दुर्घटना घडली आणि व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा : 

Worli Hit And Run Accident : शहापुरात वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक, मदत करणारे 12 जण ताब्यात

Worli Hit And Run Accident : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील राजेश शाहाला जामीन मंजूर, 15 हजाराच्या तात्पुरत्या रोख रकमेवर जामीन