- Home
- Maharashtra
- World Economic Forum 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वित्झर्लंडमध्ये मराठमोळ्या पद्धतीने जल्लोषात स्वागत
World Economic Forum 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वित्झर्लंडमध्ये मराठमोळ्या पद्धतीने जल्लोषात स्वागत
World Economic Forum 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे स्वित्झर्लंडमध्ये मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
| Published : Jan 16 2024, 09:25 PM IST / Updated: Jan 16 2024, 09:43 PM IST
- FB
- TW
- Linkdin
जागतिक आर्थिक परिषद 2024चा (World Economic Forum) स्वित्झर्लंड देशामधील दावोस येथे सोमवारपासून (15 जानेवारी 2024) शुभारंभ झाला आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (CM Eknath Shinde) सहभागी झाले आहेत.
परिषदेमध्ये (World Economic Forum 2024) सहभागी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.
स्वित्झर्लंडमधील बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे मराठमोळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum 2024) 19 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे. यासाठी महाराष्ट्राचे 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे योगदान असणार आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यास हे ध्येय पूर्ण होणार”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
“गेल्या वर्षी जागतिक आर्थिक परिषदेत 1 लाख 37 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी 76 टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. आता यापेक्षाही जास्त प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचे करार केले जातील”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ .. पाहा VIDEO
आणखी वाचा
Veerabhadra Temple : पंतप्रधान मोदींनी वीरभद्र मंदिरात केली पूजा, राम भजनही गायले PHOTO
Ayodhya Ram Mandir सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, नवीन फोटो पाहिले?