सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, मंदिरात बसवण्यात आले 14 सुवर्णद्वार. तुम्ही नवीन फोटो (Ram Mandir Photo) पाहिले का?
सोमवारी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे श्री राम मंदिर परिसरातील नवीन फोटो शेअर करण्यात आले. ज्याद्वारे मंदिराची भव्यता व सुंदरता पाहायला मिळत आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे शेअर करण्यात आलेले फोटो रात्रीच्या वेळेचे आहेत. रात्रीच्या वेळेस मंदिर सोन्यासारखे चमकत असल्यासारखे भासते.
मंदिराच्या गर्भगृहाचाही फोटो पाहायला मिळत आहे. सुंदर सुवर्णद्वाराची झलक यामध्ये दिसत आहे.
राम मंदिरातील दरवाज्यांवर सुंदर कोरीवकाम करण्यात आले आहे. तसेच मंदिराच्या तळमजल्यावर 14 सुवर्णद्वार बसवले गेले आहेत.
रामलला यांच्यासाठी सुवर्ण सिंहासन तयार करण्यात येत आहे. 15 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती आहे.
श्री राम मंदिराच्या प्रवेशाद्वारावर गजराज, सिंह, हनुमान आणि गरूडराज यांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत.
या मूर्ती राजस्थानमधील बंसी पहाडपूर गावात मिळणाऱ्या हलक्या गुलाबी रंगाच्या बलुआ दगडापासून घडवण्यात आल्या आहेत.
22 जानेवारीला संपूर्ण देश रामनामाचा गजर करणार आहे. देशवासीय रामलला यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम लाइव्ह पाहितील.