पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन महिलेने केली 3 वर्षीय मुलीची हत्या, त्यानंतर मृतदेह घेऊन 5 तास फिरली रस्त्यावर

| Published : May 22 2024, 12:10 PM IST / Updated: May 22 2024, 12:30 PM IST

murder

सार

नागपूरमध्ये अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेने पतीच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे 3 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन रस्त्यावरून फिरत राहिली.

सध्याच्या काळात लोक काय करतील आणि काय नाही याची गॅरंटी राहिलेली नाही. एकमेकांवर आणि नात्यावर विश्वास न राहिल्यामुळे लोक गुन्ह्याचे पाऊल उचलायला मागे पुढे पाहताना दिसत नाहीत. नागपूरमध्ये अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेने पतीच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे 3 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन रस्त्यावरून फिरत राहिली. त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

बाळाला घेऊन फिरत होती रस्त्यावर - 
महिलेने मुलीला मारल्यानंतर आत्महत्येचा प्लॅन बरगळला. आपल्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला अयशस्वी ठरल्यानंतर आरोपी ट्विंकल राऊत या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली. पतीशी भांडण झाल्यानंतर घराच्या बाहेर जाऊन तिने मुलीचा गळा दाबून खून केला. तिची मुलगी रियांशीला गळा दाबून मारली आहे. ट्विंकल हिला आत्महत्या करण्याची इच्छा होती पण त्या धाडस दाखवू शकल्या नाही. 

बाळाचे अंत्यसंस्कार करण्याचे राहून गेले - 
बाळाची हत्या केल्यानंतर अंत्यसंकसार करायला गेल्यानंतर त्या येथे अयशस्वी ठरल्या. त्यानंतर त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांना अनेकांनी पोलिसांनी आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ट्विंकल या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि येथे त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या ठिकाणी हे जोडपे लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी आले होते. 
आणखी वाचा - 
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन असुरक्षित? माजी आमदार निलेश लंके यांच्या ट्विटने उडाली खळबळ
त्या मुलाची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बायकोने केलेले ट्विट चर्चेत