त्या मुलाची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बायकोने केलेले ट्विट चर्चेत

| Published : May 22 2024, 11:45 AM IST / Updated: May 22 2024, 11:46 AM IST

Pune Porsche Taycan car
त्या मुलाची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बायकोने केलेले ट्विट चर्चेत
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पुणे येथील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने दोन आयटी अभियंत्यांना उडवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी केलेलं ट्विट व्हायरल होत आहे. 

पुणे येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री अल्पवयीन तरुणाने पोर्शे कारने दोन जणांना उडवले आहे. त्यानंतर या मुलाला दहा तासानंतर जामीन मिळाला. पण या प्रकरणावर सामान्य नागरिक आणि विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यामुळे आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. आता यावर माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या पत्नीने केलेली पोस्ट सगळीकडे व्हायरल आली आहे. 

सोनाली तनपुरे यांनी केले ट्विट - 
सोनाली तनपुरे यांनी अपघातात सहभागी नसलेल्या आरोपी मुलाबद्दल ट्विट केले आहे. यामध्ये त्या मुलाने आपल्या मुलाला त्रास दिल्याचा उल्लेख केला आहे. शाळेला त्याबद्दल मुलाची माहिती देऊनही त्यांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मुलाची शाळा बदलली असल्याचे सोनाली तनपुरे यांनी म्हटले आहे. त्यावर तेव्हा कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती असे त्यांनी म्हटले आहे. 

सोनाली तनपुरे यांचे ट्विट - 
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा.
आणखी वाचा - 
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन असुरक्षित? माजी आमदार निलेश लंके यांच्या ट्विटने उडाली खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय वारस कोण?, स्वत:च केलं जाहीर; म्हणाले...