सार

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, त्याचप्रमाणे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयीमध्ये लोकसभेची लढत होत आहे.

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, त्याचप्रमाणे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयीमध्ये लोकसभेची लढत होत आहे. येथे सुप्रिया सुळे यांचा जनसंपर्क असल्यामुळे उद्योजक आणि राजकारणी मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. सोनाई डेअरीचे प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात होते पण त्यांची भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यामुळे चर्चेला तोंड फुटले आहे. 

प्रवीण माने आणि देवेंद्र फडणवीस यांची कशी भेट झाली? 
इंदापूर येथे देवेंद्र फडणवीस आले असताना ते सर्वात आधी प्रवीण माने यांच्या घरी गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी दशरथ माने आणि प्रवीण माने यांच्यासोबत संवाद साधला. संवाद झाल्यानंतर या ठिकाणी शिरूर लोकसभेचे वंचितच उमेदवार मंगलदास बांदल हे आले होते. मंगलदास बांदल हे दशरथ माने यांची भेट घ्यायला आले होते असं त्यांनी सांगितलं. त्यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही संवाद झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली. 

प्रवीण माने यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हटले? 
देवेंद्र फडणवीस यांनी माने यांच्यासोबत भेट झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, माने दादांशी माझे जुने आणि वैयक्तिक संबंध, ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून मागे लागले होते, तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे येत नाही. त्यामुळे मी कबुल केले होते, मी तुमच्याकडे चहा पिण्यासाठी येईन, त्यानुसार चहा पिण्यासाठी गेलो होते. ते आमच्यासोबत असून निवडणुकीला आम्हाला त्यांची नक्की मदत होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 
आणखी वाचा - 
कुख्यात गँगस्टर अरुण गवळी जेल मधून बाहेर येणार ? पण ते प्रकरण काय आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय ? जाणून घ्या
मेक्सिकोमध्ये TikTok स्टारसह प्रियकराची हत्या, कपलवर झाडल्या 26 गोळ्या