सार

कुख्यात गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीने देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्याचांचा कालावधीही देण्यात आला आहे.

मुंबई : कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीने नुकतेच देण्यात आले आहेत. तर याचे उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्याचांचा कालावधीही देण्यात आला आहे. २००६ च्या शासन निर्णयाद्वारे कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अरुण गवळी त्या याचिकेवर नागपूर खंडपीठावर सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. असं असलं तरी तुरुंग प्रशासनाला या संदर्भात उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधीही दिला आहे. पण ज्या प्रकरणात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे ते जामसांडेकर हत्या प्रकरण काय आहे. आणि त्याचा अरुण गवळी यांच्याशी काय संबंध जाणून घ्या.

२००७ साली घडलेलं हे हत्या प्रकरण आहे. त्यावेळी अरुण गवळी हे भायखळा मतदार संघाचे आमदार होते. आणि आमदाराला थेट जन्मठेप होणं हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी. ही घटना घडली आणि नुसती जन्मठेप नाही, तर एका राजकीय नेत्याची हत्या केल्या प्रकरणी सुनावलेली जन्मठेप शिक्षा होती.अरुण गवळी यांनी ज्याची हत्या केली ते शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर.

कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरण काय आहे ?

कमलाकार जामसंडेकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २ मार्च २००७ या दिवशी संध्याकाळी पावणेपाचला मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर दिवसभरातली कामं संपवून त्यांच्या घरात टीव्ही पाहात होते. असल्फा व्हिलेजच्या रुमानी मंजिल चाळीत ते राहात होते. कमलाकार जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा ३६७ मतांनी पराभव केला होता. कमलाकार जामसंडेकर यांच्या पत्नी कोमल या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. जामसंडेकर यांची भाची मनाली हिरे स्वयंपाक घरात काम करत होती. इतक्यात घराबाहेर दोन मोटरसायकल येऊन थांबल्या होत्या. त्यावरुन चार लोक उतरले. त्यातला एकजण हा जामसंडेकर यांच्या घराकडे आला आणि त्यांच्या घरात शिरला. त्याने त्याच्याकडच्या बंदुकीने जामसंडेकर यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. हा गोळीबार अत्यंत जवळून म्हणजेच पॉईंट ब्लँक रेंजवरुन करण्यात आला. गोळीबार झालेला पाहून मनाली धावत बाहेर आली तेव्हा कमलाकार जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले. तिने मदतीसाठी धावा केला. जामसंडेकर यांच्यावर गोळीबार झाल्याचं कळताच गर्दी जमा झाली. त्या गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर तिथून पळाले.

गवळीला जन्मठेपेची शिक्षा :

कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टाने अरुण गवळी आणि इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर सबळ पुराव्याअभावी सुरेश पांचाळ, दिनेश नारकर आणि गणेश साळवी या तीन आरोपींना दोषमुक्त केलं.या प्रकरणात सरकारी वकील राजा ठाकरे यांनी हे प्रकरण दुर्मिळात दुर्मीळ आहे असे नमूद करत, दोषी आरोपींना फाशी ठोठावण्याची मागणी केली. मात्र, सरकारचा हा दावा न्यायालयाने फेटाळला. हे प्रकरण संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने जन्मठेप ठोठावली.

आणखी वाचा :

2 कोटीची गाडी आणि सतरा रुपयांची साडी, संपूर्ण देशात नवनीत राणा यांची चर्चा

Maharashtra Lok Sabha Election 2024 : काँग्रेस की शरद पवारांचा गट, पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यात कोणाच्या तिकीटावरून लढणार?

मेक्सिकोमध्ये TikTok स्टारसह प्रियकराची हत्या, कपलवर झाडल्या 26 गोळ्या