सार

विधानपरिषद निवडणुकीत कोणता पक्ष कोणाला मतदान करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं आहे. येथे मत फुटल्यास पार्टीचा उमेदवार पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीत कोणता पक्ष कोणाला मतदान करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं आहे. येथे मत फुटल्यास पार्टीचा उमेदवार पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात असून आता येथे कोणता उमेदवार निवडून येईल हे सांगता येत नाही. आमदारांना राहण्यासाठी मुंबईमध्ये हॉटेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. 

विधान परिषद निवडणुकीत बच्चू कडू कोणाला करणार मतदान?  - 
विधान पारिषद निवडणुकीत बच्चू कडू हे कोणाला मतदान करणार याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून त्यांनी आम्हाला भरपूर निधी दिला असल्याची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना कडू यांनी मी माझी गॅरेटी घेतो. राजकुमार आणि बच्चू कडू दोघांच मत शिंदेच्या उमेदवाराला जाणार. भावना गवळी आणि कृपाल तुमाने दोघांना आम्ही मतदान करणार. दोघे विदर्भाचेच आहेत” “मतदारसंघात आम्हाला भरपूर निधी मिळाला. आम्ही कर्तव्य बजावणार. या सरकारमध्ये खूप निधी मिळाला. त्याची जाण ठेऊन आम्ही मतदान करणार. कोण हरणार? कोण जिंकणार? हे आत्ताच सांगू शकत नाही” असे म्हटले आहे. 

बच्चू कडू यांनी अदृश्य शक्तीचा केला उल्लेख - 
बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना कोणतीही अदृश्य शक्ती काम करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी मी गोरगरिबांच्या मनातील नेता असून मला त्यांच्या मनातील कळत असल्याचे म्हटले आहे. आज संध्याकाळपर्यंत कोण जिंकून येईल असे सांगता येत नाही. शिंदेंचे उमेदवार दोनही निवडून येतील असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.