सार

महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही युती असणाऱ्या पक्षांनी विधानपरिषदेसाठी उमेदवार उभे केले आहेत. या दोनही युत्यांकडून उमेदवार उभे केलेले असले तरी त्यापैकी कोण निवडून येईल याची अजूनही कोणीही शाश्वती देऊ शकत नाही.

महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही युती असणाऱ्या पक्षांनी विधानपरिषदेसाठी उमेदवार उभे केले आहेत. या दोनही युत्यांकडून उमेदवार उभे केलेले असले तरी त्यापैकी कोण निवडून येईल याची अजूनही कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. शिवसेना या पक्षाने शेवटच्या टप्यात उमेदवार उभा केल्यामुळे या निवडणुकीमध्ये खरी रंगत आल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज भरल्यामुळे खरी रंगत निर्माण झाली. आजच या निवडणुकीचा निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

शरद पवार यांचे स्टेटमेंट झाले व्हायरल - 
या निवडणुकीबाबत शरद पवार यांचे एक स्टेटमेंट व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. शरद पवार यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः सेफ गेम खेळणार असल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीत छोट्या मधील छोट्या पार्टीला किंमत देणार असून त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवार यांनी यावेळी त्यांचा कोणताही उमेदवार निवडणुकीत न उतारवल्यामुळे ते सेफ झाल्याचे दिसून आले आहे. 

महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेत्याची ताकद किती आहे? - 
महाराष्ट्र विधानसभेमध्ये सध्याच्या घडीला विरोधी पक्षामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे तीन पक्ष आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांचे या निवडणुकीमध्ये मत फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी एकमेकांच्या आमदारांना हॉटेलवर नेऊन ठेवल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता कोण निवडून येत आणि कोण नाही हे थोड्याचवेळात कळेल कारण मतमोजणी ही संध्याकाळच्या वेळी होणार आहे.