पंढरपूर दौऱ्यावर असलेले दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे खासदार फुटणार का यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रत्येक पक्ष विस्तार करण्याचा प्रयत्न करतो आणि अंतिम निर्णय जनतेचा असतो, असं ते म्हणाले. 

पंढरपूर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार फोडले. त्यानंतर राजकारण बदलल्याचं आपल्याला दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दोन गट असून पवार गटाचे खासदार फुटणार का हा प्रश्न आता जनतेला पडला आहे. यावेळी पंढरपूर येथे आलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

दिलीप वळसे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या धोरणानुसार विस्तार करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणता पक्ष कोणता मार्ग स्वीकारतो यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. लोकशाहीत अंतिम निर्णय हा जनतेचा असतो. दर ५ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाला निवडून द्यायचं हे ठरवत असते.

पंढरपूरला का दिली भेट?

दिलीप वळसे यांना पंढरपूरला का भेट दिली असं विचारलं. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, आषाढी एकादशीला भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनाला येतात. त्यामुळं त्यांना त्रास होऊ नये म्हणून आधीच मंदिराला भेट दिली. यावेळी पांडुरंगाकडे राज्याच्या भल्यासाठी मागणी करणार असल्याचं दिलीप वळसे यांनी म्हटलं आहे.