Pune Crime Ketan Agarwal Death Case : केतन अग्रवालच्या हत्येनंतर सियाने तिच्या फोनमधील महत्त्वाचे चॅट डिलीट केल्याचं समोर आलं आहे. या चॅटमध्ये तिने एका मित्राशी बोलताना हे लग्न कधीच होणार नसल्याचा उल्लेख केला आहे. 

पुणे : पुण्यातील २६ वर्षीय केतन अग्रवाल याची त्याच्याच होणाऱ्या पत्नीने २० वर्षीय सिया गोयलने हत्या केली. सियाचं चेतन चौधरी या तरुणावर प्रेम होतं. या प्रेमप्रकरणातूनच सिया आणि चेतन दोघांनी मिळून केतनला लोहगडावरुन दरीत ढकलून त्याची हत्या केली. सुरुवातीला केतनचा मृत्यू हा चुकून झालेला अपघात असल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र मृत केतनच्या कुटुंबियांना सियाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आणि पुढे भयंकर हत्याकांडचा उलगडा झाला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सध्या सिया आणि तिचा प्रियकर चेतन दोघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांकडून दोघांनी कसून चौकशी सुरू आहे. सियाने ज्या ठिकाणावरुन केतनला दरीत ढकललं, त्याच ठिकाणी तिला परत नेलं. तिथे केतनच्या हत्येचा सीन रिक्रिएट करण्यात आला. आता तपासादरम्यान पोलिसांना सियाच्या फोनमधून अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. सियाने तिच्या मोबाईलमधून केतनसंबंधीचे अनेक चॅट, मेसेज डिलीट केले होते. मात्र आता तिच्या फोनमधी डिलीट केलेला डेटा, चॅट बॅकअप रिकव्हर करण्यात आलं आहे. या डिलेट केलेल्या डेटामधून सियाचा प्लॅन समोर आला आहे.

सिया गोयल आणि केतन अग्रवालचं नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होतं. उदयपूरमध्ये अतिशय शाही थाटात लग्नाची योजना होती. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यासाठी विमानाची तिकीटंदेखील बुक केली जात होती. याचबाबत एक चॅट समोर आलं आहे. सियाने डिलीट केलेल्या चॅटमध्ये तिने तिच्या मित्राकडे लग्नाला येण्यासाठी तिकीट बुकिंगसाठी आधार कार्डचा फोटो मागितला होता. आधार कार्डचा फोटो मागताना चॅटमध्ये तिने लिहिलेलं, की 'आधार कार्डचा मागचा-पुढचा फोटो पाठव लग्नाच्या तिकीटसाठी, जे लग्न होणार नाहीये, पण तरी फोटो पाठव' असं चॅट सियाच्या फोनमध्ये मिळालं आहे.

सियाचं तिच्या मित्रासोबतचं हे चॅट समोर आल्यानंतर लग्नाच्या बरेच दिवस आधीपासूनच सियाचा केतनच्या हत्येबाबतचा प्लॅन असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सियाच्या फोनमधील चॅटमध्ये कोडेड भाषेचा वापर केला गेला आहे. तसंच अनेक इमोजी वापरण्यात आलं आहेत. पोलिसांनी सियाचा दुसरा लपवलेला फोनही शोधून काढला आहे. हा फोन फॉरेन्सिक एनालिसिससाठी लॅमध्ये पाठवण्यात आला आहे. तो फोन अनलॉक झाल्यानंतर केतनच्या हत्येबाबतच्या अनेक गोष्टी समोर येतील.