नाशिक लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घेणार निर्णय? हेमंत गोडसे यांना बोलावले वर्षा बंगल्यावर

| Published : Apr 06 2024, 02:28 PM IST / Updated: Apr 06 2024, 02:29 PM IST

CM Eknath Shinde

सार

नाशिक लोकसभेचा महायुतीचा कोण उमेदवार असेल याबद्दल अजूनही तिढा सुटलेला नाही. दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीने येथे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे

नाशिक लोकसभेचा महायुतीचा कोण उमेदवार असेल याबद्दल अजूनही तिढा सुटलेला नाही. दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीने येथे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. येथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट दिले जाणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ हे येथून उमेदवार असतील असं सांगण्यात येत आहे. 

हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ष बंगल्यावर बोलावून घेतले आहे. यात त्यांना तिकीट जाहीर केले जाणार का त्यांची समजूत काढली जाणार हे अजूनही ठरलेलं नाही. त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात कोण असेल हे अजूनतरी ठरलेलं नाही. दुसरीकडे राजाभाऊ वाजे हे प्रचारात सक्रिय असून रोज त्यांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिला आहे. 

बबन घोलप यांनी ठाकरे गतले रामराम करून दुसऱ्या बाजूला शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. येथून मागील वेळी हेमंत गोडसे हे विजयी झाले होते. यावेळी छगन भुजबळ यांना तिकीट दिले जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मी निवडणूक लढायला तयार असून नाशिकच्या जनतेची जी इच्छा असेल ती पूर्ण केली जाईल असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.