Maharashtra Vidhan Parishad Election : गणपत गायकवाडांच्या मतदानावरुन अंबादास दानवेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

| Published : Jul 12 2024, 01:16 PM IST / Updated: Jul 12 2024, 01:17 PM IST

ambadas danve

सार

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु असून आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरुन अंबादास दानवेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.

 

Maharashtra Vidhan Parishad Election : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे म्हटले. सत्ता कुठंपर्यंत पोहोचते, न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हे दिसून येते. अनिल देशमुख यांच्यावर आरोप होते. गणपत गायकवाड यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी मारताना सगळ्या जगाने बघितले आहे. अनिल देशमुख यांना मतदानाला येऊ दिले नव्हते. गणपत गायकवाड यांना मतदानाला परवानगी दिली तर हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री अनिल देशमुख यांनी देखील यावरुन हल्लाबोल केला आहे.

निवडणूक आयोग सालदार, गडी असल्यासारखं काम करतो?

निवडणूक आयोग पक्षपाती आहे का? हा प्रश्न निर्माण होणार आहे. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग त्यांचा बटीक, त्यांचाच घरचा सालदार, गडी अशा पद्धतीने काम करतो हे स्पष्ट होईल, असे अंबादास दानवे म्हणाले.

अनिल देशमुख काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री अनिल देशमुख यांनी देखील यावरुन हल्लाबोल केला आहे. गणपत गायकवाड यांना एक न्याय देतात आणि आम्हाला एक न्याय दिला जातो. मला मतदान करू दिले नव्हते त्यामुळे आम्ही या सगळ्या विषयासंदर्भामध्ये दाद मागणार आहोत, असे देशमुख म्हणाले.

आम्ही संपूर्ण प्रकरणी आमच्यावर झालेल्या अन्याय बाबत आवाज उठवणार आहोत. माझ्यावर खोटे आरोप लावून तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यावेळी देखील निवडणूक होती त्यावेळी मी परवानगी मागितली होती की मला मतदानाची परवानगी द्यावी, मात्र कोर्टाने मला परवानगी दिली नव्हती. लोअर कोर्ट आणि हायकोर्टाने मला परावनागी दिली नव्हती. आता गणपत गायकवाड यांना कोर्टाने परवानगी दिली आहे. गणपत गायकवाड यांना परवानगी द्यायला नको होती. भाजपने मात्र लोअर कोर्टाच्या माध्यमातून दबाव टाकून गणपत गायकवाड यांना परवानगी मागून घेतली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले. भाजपकडून कशा प्रकारे सत्तेचा गैरवापर केला जात आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार :

भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत

शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे

राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर

काँग्रेस : प्रज्ञा सातव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुरस्कृत : जयंत पाटील

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : मिलिंद नार्वेकर

आणखी वाचा :

बच्चू कडू हे विधानपरिषदेत कोणाला करणार मतदान? प्रहार पक्षाचे मतदान 'याच' उमेदवारांना मिळणार