बापूसाहेब पठारे: पुण्यातील लोहगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पाठारे आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी बंडू खांदवे यांच्यात वाद झाला.

पुणे: महाराष्ट्रातील राजकारणात कधी होईल हे सांगता येईल सांगता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) यांचे वडगाव शेरी येथील आमदार बापूसाहेब पाठारे यांना धक्काबुकी झाल्याची घाना घडली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बंडू खांदवे यांच्यासोबत वाद झाला आणि नंतर धक्काबुकी झाल्याची माहिती समजली आहे. याप्रकरणात लोहगाव पोलीस स्टेशनमध्ये दोनही बाजूंनी गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकं काय झालं? 

लोहगाव भागातील एका कार्यक्रमात आमदार बापू पठारे आणि हवेली पंचायत समितीचे माजी सभापती आणि स्थानिक रहिवासी बंडू खांदवे यांच्यात वाद झाला. हा वाद झाल्यानंतर आमदार बापू पठारे यांना धक्काबुकी करण्यात आली आणि ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली. लोहगाव येथे एका सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याच्या सन्मानार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बंडू खांदवे यांनी आमदारांना घातला घेराव 

सदर घटना घडून गेल्यानंतर बंडू खांदवे यांच्या समर्थकांनी आमदार पठारे यांना घेराव घालण्यात आला. त्यानंतर पठारे यांचे समर्थक आणि पोलीस घटनास्थळी आले. यावेळी पोलिसांनी दोनही बाजूंच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर दोनही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या.

आमदार बापू पाठारे यांनी स्थानिक नागरिकाला केली मारहाण 

सदर घटनेचा तपास पोलिसांच्या वतीने सुरु आहे. कार्यक्रम सुरु होण्याच्या आधी बापू पठारे आणि त्यांच्या चालकाकडून एका स्थानिक नागरिकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आमदार पठारे यांना धक्काबुक्की करण्यात आली असं सांगण्यात आलं आहे. बापू पठारे हे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे एकमेव आमदार आहेत.