आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नाशिक विभागात नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. या तपासणी मोहिमेत भेसळ आणि अस्वच्छता आढळल्याने नाशिक, जळगाव आणि नंदुरबारमधील ९ हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.

आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नाशिक विभागात धडक कामगिरीला सुरुवात केली आहे. त्यांनी येथे हॉटेलवर धाड टाकून भेसळ सुरु असणाऱ्या ठिकाणांचे परवाने रद्द केले. या मोहिमेमध्ये ९ हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. त्यामुळं विभागात एकच खळबळ उडाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

विशेष तपासणी मोहिमेत केली कामगिरी

नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यात यावं म्हणून हि मोहीम राबवण्यात आली होती. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये एकूण २० ठिकाणांची पाहणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी तपासणीच्या वेळेला अनेक गंभीर प्रकार आढळले आहेत.

हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने केले रद्द 

या घडलेल्या प्रकारामुळं हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने रद्द करण्यात आले. परवाने बंद केलेल्या हॉटेलमध्ये हॉटेल ग्रीन वॉल पंचवटी (नाशिक), हॉटेल राधिका, द्वारका (नाशिक), हॉटेल क्राऊन पॅलेस पेठ रोड (नाशिक), लक्ष्मी हॉटेल सिन्नर, हॉटेल त्रिमूर्ती एमआयडीसी जळगाव, हॉटेल भानूस, जळगाव, जाधव रेस्टॉरंट, नंदुरबार यांचा समावेश आहे.