राज्यात वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारने दर तीन तासांनी एसएमएस अलर्टची सोय केली असून, धोकादायक ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, मिसिंग लिंकवरील खड्ड्यांची एमएसआरडीसीकडून तात्काळ दुरुस्ती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई: राज्याच्या विविध भागात पाऊस मोठ्या प्रमाणावर वाढलाय. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन केलं आहे. आपण नागरिकांना दर तीन तासांनी एसएमएस पाठवत आहोत. आपण वेगवेगळ्या प्रकारे अलर्ट देऊन नागरिकांना सतर्क करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. त्यांना मिसिंग लिंकवर पडलेल्या खड्यांबाबत यावेळी प्रश्न विचारला होता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्रवास टाळता आला तर टाळायला हवा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाच्या काळात प्रवास टाळता आला तर टाळायला हवं असं म्हटलं आहे. जी ठिकाणी धोकादायक आहेत तिथं काळजी घेण्याच्या आपण सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी अडचणी येतील, त्या सोडवण्याचा सरकारच्या वतीने प्रयत्न सुरु आहे. लोकांनी अलर्टस फॉलो करून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा, असं त्यांनी यावेळी सांगितलंयं.

मिसिंग लिंकवर दोन ठिकाणी खड्डे पडले

मिसिंग लिंकवर दोन ठिकाणी खड्डे पडलेत. यावरून सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यात येत आहे. रस्त्यावर सगळीकडं खड्डे पडलेले नाहीत. जिथं खड्डे पडलेत, त्याची योग्य काळजी हि एमएसआरडीसीच्या वतीने घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कुठं जर खरच काही कमतरता असतील तर त्या लवकरच दूर केल्या जाणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय.