पंढरपूरच्या वारी दरम्यान, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची दुःखद घटना घडली. हल्लेखोरांनी वारकऱ्यांना कोयत्याने धमकावून लुटले आणि मुलीला काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
आषाढी वारीचा उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. पंढरीच्या वारीच्या वेळेला या संपूर्ण महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण असते, वारीच्या निमित्ताने सगळीकडे आनंदाचे क्षण साजरे होत असून यातच एक दुःखद घटना घडली आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना लुटून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची दुःखद दुर्घटना महाराष्ट्रात घडली आहे.
वारकऱ्यांना लुटून मुलीवर अत्याचार केला
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. वारकरी या ठिकाणी येऊन चहा पिण्यासाठी बसलेले होते. ते गाडीत बसत असताना त्यांच्या गळ्याला हल्लेखोरांनी कोयता लावला आणि त्यांना धमकावण्यात आले. त्या दोघांना लुटून अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेण्यात आले आणि नंतर तिच्यावर नराधमांनी अत्याचार केला.
भक्तांना बोगस पासचे केले वाटप
या प्रकरणात दौंड पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांपुढे आरोपीना शोधून काढण्याचं फार मोठ आव्हान आहे. काही दिवसांपूर्वी विठुरायाच्या दर्शनाचे बोगस पास विकण्यात आले होते. तुम्हाला देवाच्या दर्शनाचे पास १०० रुपयांत देतो असं म्हणून त्यांची फसवणूक करण्यात आली होती. जुन्या दर्शन पासवर नवीन पास असल्याचं सांगण्यात आलं होत.
