Thane Municipal Corporation Job: ठाणे महानगरपालिकेत गट क आणि गट ड मधील 1773 पदांसाठी मेगाभरती सुरू आहे. 11 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली अर्ज प्रक्रिया आता 17 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
ठाणे: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी! ठाणे महानगरपालिकेत तब्बल 1773 पदांवर मेगाभरती सुरू आहे. ही भरती गट क आणि गट ड मधील विविध पदांसाठी आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 11 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून, आता शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
कोणकोणती पदे आणि कोणासाठी संधी?
या भरतीत खालीलप्रमाणे विविध पदांचा समावेश आहे.
सहायक परवाना निरीक्षक
लिपिक
कनिष्ठ अभियंता
स्टाफ नर्स
तांत्रिक सहाय्यक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
इतर अनेक पदे
एकूण 65 सेवा विभागांमध्ये 1775 पदे रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता काय असावी?
उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता असावी.
10वी / 12वी उत्तीर्ण
पदवी / पदव्युत्तर पदवी
B.Sc / M.Sc
GNM
DMLT
B.Pharm / D.Pharm
इंजिनिअरिंग संबंधित पदवी
महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा
घटक तारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख 11 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 (मध्यरात्री 12 वाजेपर्यंत)
परीक्षा पद्धत ऑनलाइन (तारीख अद्याप जाहीर नाही)
अर्ज शुल्क किती आहे?
प्रवर्ग परीक्षा शुल्क
खुला वर्ग ₹1000
मागास / अनाथ ₹900
माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक शुल्क माफ
वयोमर्यादा काय आहे?
किमान वयोमर्यादा: 18 वर्षे
कमाल वयोमर्यादा:
सामान्य प्रवर्ग: 38 वर्षे
ओबीसी व अनाथ प्रवर्ग: 43 वर्षे
अर्ज कसा करावा?
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. इच्छुकांनी ठाणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. जाहिरातीत दिलेली संपूर्ण माहिती नीट वाचूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
अजून अर्ज केला नाही?, आता वेळ वाया घालवू नका!
अर्ज करण्यासाठी फारसे दिवस उरलेले नाहीत. त्यामुळे इच्छुकांनी आजच अर्ज भरावा आणि भरती प्रक्रियेसाठी तयारीला लागावे. ही संधी तुमचं करिअर घडवू शकते!


