- Home
- Maharashtra
- Police Sub Inspector Bharti 2025: पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदांसाठी २५% खातेअंतर्गत परीक्षा पुन्हा सुरू, तरुण पोलिस कर्मचाऱ्यांना दिलासा
Police Sub Inspector Bharti 2025: पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदांसाठी २५% खातेअंतर्गत परीक्षा पुन्हा सुरू, तरुण पोलिस कर्मचाऱ्यांना दिलासा
PSI Bharti 2025 Maharashtra Latest Update: राज्य सरकारने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी २५% पदांवर खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे 5 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना अधिकारी होण्याची संधी मिळणारय.

मुंबई : राज्य सरकारने अखेर एक मोठा निर्णय घेत, पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी २५ टक्के पदांवर खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या, किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना आता पुन्हा एकदा अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
बंद केलेली परीक्षा पुन्हा सुरू
फेब्रुवारी 2023 मध्ये शासन निर्णयाद्वारे ही परीक्षा बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक पात्र, मेहनती आणि इच्छुक पोलिस कर्मचाऱ्यांना बढतीच्या मार्गानेच PSI पद मिळवण्याची मर्यादा होती. परिणामी, त्यांना निवृत्तीनजीकच काही वर्षे अधिकारीपद मिळत होते. या निर्णयाने मोठा वर्ग नाराज झाला होता.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पुढाकार
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आणि एप्रिल 2025 मध्ये लेखी मागणी करत ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सरकारने अधिकृत घोषणा केली आहे.
"मेहनती आणि कर्तव्यनिष्ठ पोलिस अंमलदारांना अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी यासाठी विभागीय परीक्षा अत्यंत गरजेची होती. या निर्णयामुळे पोलिस दलात नवचैतन्य येईल."
– योगेश कदम, गृहराज्यमंत्री
तरुण पोलिसांसाठी सुवर्णसंधी
विभागीय परीक्षेमुळे तरुण व तगडे पोलिस अंमलदार लवकरच अधिकारीपदावर पोहोचू शकतील. यामुळे त्यांना पुढील २०-२५ वर्षे PSI किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर सेवा करण्याची संधी मिळेल. पूर्वी केवळ वाढीच्या आधारावरच मिळणारी ही पदोन्नती आता स्पर्धेच्या मार्गाने शक्य होणार आहे.
पोलिस दलात नवे उत्साहाचे वातावरण
हा निर्णय केवळ परीक्षेच्या पुर्नसुरुवातीचा नसून, पोलिस खात्यातील इच्छुक कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी पाऊल आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण होईल, आणि कामकाजात अधिक कार्यक्षमतेचा प्रत्यय येईल.

