सार
तेलंगणात काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी अशी आमची मागणी असल्याचे वक्तव्य किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली आहे. याआधी कर्जमाफी करण्यात आली मात्र त्यात अटी शर्ती इतक्या लागू केल्या की लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे आता जर सरकार कर्जमाफी करणार असेल तर अटी शर्तींच्या बाबतीत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक करु नये असे अजित नवले म्हणाले.
40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी
तेलंगणामधील काँग्रेस सरकारने 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेवंथा रेड्डी यांनी 31 हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची घोषणा काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती. त्याप्रमाणे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तेलंगणा मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यात 34 हजार कोटी रुपयांच्या कृषी कर्ज माफीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज सरकार माफ करेल असे आश्वासन मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी दिले आहे.